Accident file photo
गोवा

Patradevi Highway Accident | पेडणे पत्रादेवी येथे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; जेष्ठ नागरिकाला कंटेनरने चिरडले

Patradevi Highway Accident | फरार चालकाला मोप पोलिसांनी रत्नागिरीत पकडले

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

पेडणे पत्रादेवी येथे सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर मॉर्निंग वॉकसाठी गेलेले नारायण सहदेव सावळ (वय ६५) यांना कंटेनरने चिरडले. यात ते जागीच ठार झाले. अपघातानंतर वाहन चालक मोहम्मद अजीम खान (वय २५, रा. उत्तर प्रदेश) हा कंटेनर (एमएच १२ व्हीटी ७०४८) घेऊन फरार झाला.

माहिती मिळताच मोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनरचा तपास सुरू केला. हा कंटेनर रत्नागिरी-लांजा येथून ताब्यात घेण्यात आला. अपघातात ठार झालेले नारायण सावळ हे वास्को येथील कंपनीतून निवृत्त झाले होते. मोप पोलिसांनी २८१, १०६ (१) १३४ एबी मोटार कायद्याखाली गुन्हा नोंदवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT