गोवा

Goa news | पेडणेतील सरकारी कार्यालये स्थलांतरित करा

पंच प्रशांत नाईक यांची मागणी : ... अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : पेडणे शासकीय कॉम्प्लेक्स मधील बालकल्याण विभागाच्या छपराचा कोसळून कर्मचारी जखमी झाला. ही इमारत जीर्ण झाली असून या इमारतीतील सरकारी कार्यालये स्थलांतरित करण्याची गरज आहे. आठ दिवसांत कार्यालयांचे स्थलांतर न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंच प्रशांत नाईक यांनी दिला. नाईक म्हणाले, शासकीय कॉम्प्लेक्स सध्या कमकुवत बनले आहे.

१९९० साली या इमारतीची उभारणी केली होती. परंतु, त्याकडे दुरुस्तीच्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम खाते इमारत विभागाने दुर्लक्ष केले. या इमारतीचे काही भाग कोसळत असून अनेकदा उपजिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते इमारत विभागाला निवेदन पत्र लिहून याची दुरुस्ती करावी, अशी सूचना केली २०२४ साली उपजिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आली होती. मात्र, त्याची अद्याप कार्यवाही करण्यात आली होती. त्यामुळे स्लॅबचा भाग कोसळून एक कर्मचारी जखमी झाला.

या पूर्ण इमारतीची दुरुस्ती करण्याची गरज आहे. त्यामुळे या इमारतीच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी आपण उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली. ते म्हणाले, ही इमारतीच्या भिंती आणि खांबांना तडे गेलेले आहेत. त्यामुळे ही इमारत दिवसेंदिवस कमकुवत बनत चालली आहे. त्यामुळे कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. याची सरकारने दखल घेऊन या इमारतीला सुरक्षा देण्याबरोबरच सध्या इमारत दुरुस्ती करताना सर्व कार्यालय इतरत्र स्थलांतरित करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT