Paro Movie | 
गोवा

Paro Movie | लग्नासाठी महिलांची वारंवार विक्री; 'पारो' चित्रपटातून समोर येणार क्रूर वास्तव

Paro Movie | देशाला माहीत नसलेली स्त्री शोषणाची काळी बाजू; तृप्ती भोईर यांनी का बनवला 'पारे'?

पुढारी वृत्तसेवा

पणजी : कांतिराज सघाट

जेव्हा लोक फक्त स्त्रीचे शरीर पाहतात; पण तिचा वरचा भाग म्हणजे तिलाही मेंदू आहे हे पाहत नाहीत. तिला केवळ एक वस्तू मानतात, तेव्हा खूप वाईट वाटते. जेव्हा या सगळ्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा मला जाणवले की मी यावर चित्रपट बनायला हवा; कारण संपूर्ण देशाला याची खरोखरच जाणीव नाही.

हरियाणाामध्येही, तेथील लोकांनाच माहित नाही की त्यांच्याच राज्यात, एका जिल्ह्यात हे घडतंय. लग्नांसाठी त्यांची वारंवार विक्री केली जाते. ही खरोखरच अत्यंत क्रूर प्रथा आहे आणि खूप धक्कादायक आहे; कारण आपण माणसे आहोत, स्त्री ही काही वस्तू नाही. म्हणूनच मला हा चित्रपट बनवावासा वाटला, अशी प्रतिक्रिया पारे चित्रपटातील अभिनेत्री आणि निर्माती तृप्ती भोईर यांनी व्यक्त केली.

इफ्फीत बुधवारी (दि. २६) पारे चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता त्या बोलत होत्या. चित्रपटाची कथा कशी सुचली हे सांगताना भोईर म्हणाल्या की, एक डॉक्युमेंटरी पाहिली होती. त्यानंतर मला खूप धक्का बसला होता. हे खरं आहे की खोटं, मला खरोखरच तपासायचं होतं आणि म्हणून मी साडेवार वर्षांपूर्वी तिथूनच सुरू झाली. मी गेले आणि या सर्व ब्राइड स्लेव्हसना प्रत्यक्ष भेटले. त्या वेळी सुमारे ६२ अशा महिलांना भेटले, ज्या ब्राइड स्लेव्हस आहेत आणि भारतातील वेगवेगळ्या राज्यांतून आल्या आहेत

त्या सगळ्या एकाच दुःखात होत्या. त्यांना १० मुलं, १४ मुले, १५ मुले आहेत आणि त्यांची पुन्हा पुन्हा विक्री केली जाते. एका व्यक्तीला विचारले की, तुम्ही लस कसा, तेव्हा वेगवेगळ्या राज्यांतून, वेगवेगळ्या धर्माच्या मुली येतात; लग्नासाठी तुम्ही त्यांचं काय करता ? तर ते म्हणाले, जिल्हा स्वतःची ओळख नाही. भटक्या बकरीला किंवा हरवलेल्या बकरीला स्वतःची ओळख नसते; तिला फक्त कापायचं आणि वाटायचं असतं. त्यामुळे मला याबद्दल खोलवर विचार करायला भाग पडले.

त्या म्हणाल्या की, जितक्या मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी येतात आणि जितक्या सापडतात, त्याचा काही ताळमेळच नाही. एका वर्षात जर काढून पाहिले तर हे सगळे तपशील आम्ही या चित्रपटात वापरलेले नाहीत, पण हे वास्तव आहे की एका वर्षात कितीतरी स्त्रिया, किती मुली मोठ्या संख्येने गायब होत आहेत. जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जाता, तिथला परिसर आणि लोकांचे निरीक्षण करता, तेव्हा मला वाटतं की ती स्वतःची तयारी असते.

शेल्टर फाउंडेशनकडून काम

माझी शेल्टर फाउंडेशन ही एनजीओ यावर काम करते. हे फक्त या चित्रपटापुरतं थांबलेलं नाही, तर काम सुरू आहे. शेल्टर फाउंडेशनने गेल्या चार वर्षांत भारतातील पहिला ब्राइड स्लेव्हरीचा डेटा संकलित केला आहे. त्यात राष्ट्रीय ओळख, मुलांची नावे आणि फोन नंबरसह २,००० महिला आणि मुलांची नोंद आहे. आम्ही हा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला आहे. आमच्या सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला.

नॅशनल कमिशन फॉर वुमनने फायडिंग फॅक्ट ऑफ पारे ब्राइड स्लेव्हस (सत्यशोधन समिती) नावाची एक समिती स्थापन केली. तीन महिन्यांपूर्वी त्या समितीला मार्गदर्शन केले. मीही त्या समितीत आहे. आम्ही या गावांमध्ये गेलो. त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की तिथे दरमहा ५ हजार अल्पवयीन गरोदरपणाच्या घटना घडतात. ते सरकारकडे नोंदवलेलं आहे. दरमहा ५ हजार अल्पवयीन गरोदरपण, त्यामुळे अंदाज लावू शकता की, वर्षाला ते नक्कीच २५ हजार किंवा ३० हजार पेक्षा जास्त असेल.

स्त्रीचे शोषण जगभरात : गजेंद्र अहिरे

दिग्दर्शक गजेंद्र अहिरे म्हणाले की, पारे संबंधी परिस्थिती जेव्हा लक्षात आली, तेव्हा एकतर हा विषय इतका मोठा आहे की तो दोन तासांत पकडणं तसंही व्यावहारिकदृष्ट्या कठीण आहे. त्यामुळे नाट्यमयरीत्या सादर करून काय परिणाम साधू शकतो, तितकंच त्यासाठी ठेवलं होतं.

दरम्यान, चित्रपटातील प्रामाणिकपणामुळे अक्षरशः श्वास रोखून धरण्यास लावणार आहे. हा केवळ मनोरंजनासाठीचा चित्रपट नव्हता, तर स्त्री आणि पुरुष यांच्यात माणूस म्हणून कसं वागावं याबद्दलचं एक अतिशय खोलवरचं आवाहन असल्याचे जाणवते.

महिलांच्या गुलामगिरीची हृदयद्रावक कथा.

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर

हरियाणातील मेवात जिल्ह्यात पारोच्या नावाखाली महिलांची विक्री केली जाते. शेळीपेक्षा कमी दराने महिलां मुलींना विकले जाते. पुन्हा पुन्हा विकले जाते व तिला पारो म्हणून गुलामगिरीत ठेवले जाते. तिचे लैंगिक शोषण अनेकांकडून होते. हे भयानक सत्य पारो चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहे.

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित व तृप्ती भोईर निर्मित व मुख्य भूमिका केलेला हा चित्रपट काळजाचा ठाव घेतो. वयाच्या १३ व्या वर्षी, चांदला वधू म्हणून विकले जाते आणि तेथूनच पारोच्या क्रूर वधू-गुलामगिरी प्रथेतील तिच्या विनाशकारी प्रवासाची सुरुवात होते.

आपल्या कुटुंबापासून दुरावलेली, अत्याचाराला बळी पडलेली आणि आपल्या मुलांपासून वारंवार विभक्त झालेली ती, अकल्पनीय नुकसान सहन करत असतानाही मोठ्या आशेने झपाटलेली असते. मोहर नावाच्या एका दृढनिश्चयी विद्वानाच्या संशोधनातून चांदची लपलेली कहाणी उजेडात येते आणि स्त्रियांना माणूस म्हणून नव्हे, तर वस्तू म्हणून वागणूक देणाऱ्या व्यवस्थेचा पर्दाफाश करते.

जेव्हा चांदचा तिसरा नवरा, रशीद, तिचा विश्वासघात करतो; तेव्हा आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी तिला एक अशक्य निवड करण्यास भाग पडते. असे करताना, तिला स्वतःमधील एका विलक्षण शक्तीचा शोध लागतो. जेव्हा तिची कहाणी विद्यापीठाच्या एका मेळाव्यात पोहोचते, तेव्हा चांदचा आवाज एक बंडखोरीचे प्रतीक बनतो आणि अनेकदा दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या वास्तवाला सामोरे जाण्यास इतरांना भाग पाडतो. पारो: वधू-गुलामगिरीची न सांगितलेली कहाणी ही जगण्याची धडपड, धैर्य आणि आशेची एक शक्तिशाली कथा आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT