पणजीत चित्रपट शूटिंगसाठी आकारणार 1 लाख शुल्क. Pudhari File Photo
गोवा

Goa : पणजीत चित्रपट शूटिंगसाठी आकारणार 1 लाख शुल्क

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पणजी महापालिकेच्या हद्दीत आता चित्रपटाचे शूटिंग घेण्यास महाग पडणार आहे. कारण, मनोरंजन सोसायटीने या महिन्यापासून शुल्क वाढवले आहे. पणजीत जर चित्रीकरण करायचे असेल, तर दरदिवशी 1 लाख रुपयांचे शुल्क द्यावे लागणार आहे.

या शुल्काव्यतिरिक्त मनोरंजन सोसायटीकडे अर्ज करण्यासाठी 5 हजार रुपये भरावे लागणार आहेत. जे परत मिळणार नाहीत. अर्ज मंजूर झाल्यास 20 हजार रुपये अंतिम शुल्क असेल. या व्यतिरिक्त सरकारी खात्याचे 25 हजार रुपये तर पंचायत, पालिका शुल्क 25 हजार रुपये इतके असणार आहे. स्थानिक चित्रपट निर्मात्यांना मात्र शुल्कात सूट असून, त्यांना एकूण 10 टक्के शुल्क भरावे लागणार आहे. जे गोव्याच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी लघुपट निर्मिती करतील, त्यांच्याकडून मात्र चित्रीकरण शुल्क आकारले जाणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT