गोवा पोलिस  file photo
गोवा

Panaji | 'गार्ड ऑफ ऑनर' विनाच पोलिस अधीक्षक माघारी

शस्त्रागाराचा कर्मचारी गैरहजर राहिल्याने घडला प्रकार

पुढारी वृत्तसेवा

पणजी : नव्याने अधीक्षकपदाचा ताबा घेणाऱ्या अधिकाऱ्यांना गार्ड ऑफ ऑनर म्हणजे सलामी देण्याची पोलिस खात्यात परंपरा आहे. रायफरने गार्ड ऑफ ऑनर देताना सर्व पोलिस अधिकारी तेथे हजर असावेत, असा नियम आहे. नुकतेच पोलिस अधीक्षकपदी बढती झालेल्या एका अधिकाऱ्याने दक्षिण गोव्यातील एका पोलिस स्थानकाला भेट दिली असता, सलामी राहिली बाजूला. ज्या रायफलने त्यांना सलामी दिली जाणार होती; त्या शस्त्रागाराची चावी असलेला कर्मचारी गैरहजर होता. पोलिस स्थानकाचे निरीक्षकच उपस्थित नव्हते. बराच वेळ वाट पाहून बिचाऱ्या अधीक्षकांवर सलामी न घेताच मागे परतण्याची वेळ आली.

सदर घटना बुधवारी घडली नुकतेच राज्य पोलिस सेवेत उपअधीक्षकपद भूषवलेल्या अधिकाऱ्यांना अधीक्षकपदी बढती देण्यात आली होती. बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांचे आठवड्याभरापूर्वी पोस्टिंग झाले होते. त्यातील एक अधीक्षक दक्षिण गोव्यातील एका पोलिस स्थानकाचा बुधवारी ताबा स्वीकारतील, असे सूचित केले होते. त्यानुसार अधीक्षक पोलिस स्थानकावर सकाळीच हजर झाले; मात्र अधीक्षक आल्याचे कळताच सर्वांचा गोंधळ उडाला. त्यांच्या भेटीबद्दल पोलिस निरीक्षक अनभिज्ञ होते.

... अन् अधीक्षक म्हणाले, पुन्हा येतो

रायफलने नूतन पोलिस अधीक्षकांना सलामी दिली जाणार होती; परंतु पोलिस स्थानकाची हत्यारे ठेवलेल्या शस्त्रागराला कुलूप होते आणि त्या कुलुपाची चावी ज्या पोलिस कर्मचाऱ्याच्या ताब्यात असते, तो कर्मचारी गैरहजर होता. पोलिस अधीक्षकांनी बराच वेळ वाट पाहिली आणि नंतर ते पुन्हा येतो, असे सांगून निघून गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT