Panaji Municipal Corporation Reservation 
गोवा

Panaji Municipal Election Case | मतपत्रिका गोपनियता आव्हान याचिकेत अधिकारक्षेत्राला प्रतिवाद्यांचे आव्हान

Panaji Municipal Election Case | पुढील सुनावणी 25 जूनला : आणखी याचिका सादर

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजी महापालिका निवडणुकीच्या मतपत्रिकेच्या गोपनियतेला आव्हान दिलेली याचिका जिल्हा व सत्र न्यायालयासमोर सुनावणीस आली असता, प्रतिवादी नगरसेवकांनी अधिकारक्षेत्राला आव्हान दिले आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणत्याच त्रुटी नसल्याचा दावा प्रतिवाद्यांनी केला आहे. पुढील सुनावणी २५ जूनला ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, पणजी महापालिका प्रभाग १ मधून निवडणूक लढवू न शकलेले नेल्सन काब्राल यांनीही या प्रभाग फेररचना व आरक्षणाला आव्हान दिले आहे. मतपत्रिकेच्या गोपनियतेला आव्हान याचिकेसोबत काब्राल यांचीही याचिका एकत्रित सुनावणीसाठी घेण्यात येईल, असे स्पष्ट करून तीसुद्धा त्याच दिवशी सुनावणीस ठेवली आहे.

पणजी महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले विष्णू नाईक व इतरांनी मतपत्रिका गोपनियतेसंदर्भात याचिका सादर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने कायद्याच्या चौकटीत असलेल्या नियमांनुसारच ही निवडणूक घेतलेली असल्याने त्यातील गोपनियतेचे उल्लंघन झाले नाही. त्यामुळे ही याचिका सुनावणीसाठी विचारात घेतली जाऊ नये.

यावेळी याचिकादार नाईक यांच्या वकिलांनी याचिकेत दुरुस्तीसाठी विनंती केली. त्यामुळे याचिकादार आपल्या भूमिकेशी सुसंगत नाही, असा युक्तिवाद महापालिका आयुक्त व नगरसेवकांतर्फे अॅड. नितीन सरदेसाई यांनी केला. नेल्सन काब्राल यांनी याचिकेत प्रभाग फेररचना व आरक्षणातील बदल हा जाणूनबुजून केला आहे.

प्रभाग २ मधील अनुसूचित जमातीच्या मतदारांना प्रभाग १ मध्ये समाविष्ट करून तो महिलांसाठी राखीव ठेवला गेला. याचिकादाराला या प्रभागमध्ये निवडणूक लढवता येता कामा नये, यामागील त्यात बदल करण्याचा राजकारण्याचा उद्देश होता. मात्र, त्यांचा हा दावा प्रतिवाद्यांच्या वकिलांनी फेटाळून लावला. या याचिकेवरही सुनावणी घेण्याच्या अधिकारक्षेत्राला विरोध करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT