Panaji Municipal Corporation Reservation 
गोवा

Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

Panaji Municipal Corporation | मार्केटची पाहणी ; विनापरवाना खाद्यपदार्थ बनवणाऱ्या दुकानाला ठोकले ताळे

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
वास्को येथील मार्केटला आग लागून २०० हून अधिक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या पार्श्वभूमीवर पणजी मार्केटमधील अग्निसुरक्षा उपकरणे निकामी झाल्याचा आणि तातडीने उपाययोजना न केल्यास १०९ दुकानांना आगीचा धोका असल्याचा इशारा देणारे वृत्त शनिवार, दि. ३१ रोजीच्या दैनिक 'पुढारी'मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्तस्तानंतर जागे झालेल्या पणजी महापालिकेने शनिवारी मार्केटची पाहणी केली.

पणजी महानगरपालिकेच्या मार्केट समितीच्या अध्यक्ष कॅरीलोना पो यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत मार्केटची पाहणी केली. यावेळी परवानगी नसताना चहा व खाद्यपदार्थ बनवणाऱ्या दुकानाला ताळे ठोकण्यात आले. तसेच अग्निसुरक्षा उपकरणांची पाहणी करून ती तपासण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

पणजी मार्केटमधील अग्निशामक उपकरणे मोडकळीस आली आहेत. ती बदलण्याची सूचना अग्निशामक दलाने करूनही महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले होते. वास्को येथील आगीच्याुर्घटनेनंतर महापालिकेला जाग आली आहे.

आता पणजी मार्केटमध्ये नवीन अग्निसुरक्षा उपकरणे बसवली जातात की केवळ पाहणीचा फार्स केला जातो, हे येत्या काळात स्पष्ट होईल. वास्को मार्केटमध्ये झालेल्या अग्निप्रलयानंतर राजधानी पणजी शहरातील मार्केटच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला होता. त्यामुळे मार्केटची पाहणी करून आवश्यक त्या उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पो यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT