Panjim Muncipal Corporation | पणजी महापालिकेसाठी 60.07 टक्के मतदान, 13 मार्च रोजी मतमोजणी 
गोवा

Panjim Muncipal Corporation | पणजी महापालिकेसाठी 60.07 टक्के मतदान, 13 मार्च रोजी मतमोजणी

मतदान प्रक्रिया शांततेत, 30 जागासाठी 69 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद. पणजी कुणाची बाबूश की उत्पल, शुक्रवारी ठरणार!

पुढारी वृत्तसेवा

पणजी: पणजी महापालिकेच्या 30 प्रभागासाठी आज बुधवारी 60.07 टक्के मतदान झाले. 2021 मध्ये महापालिकेसाठी 70.19 टक्के मतदान झाले होते. 2021 मध्ये भारतीय जनता पक्ष व मंत्री बाबूश मोन्सेरात समर्थक पॅनलने 30 पैकी 25 जागा पटकावल्या होता. आजचे मतदान शांततेत झाले. 30 जागासाठी 69 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून शुक्रवार दि.13 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. त्याच दिवशी पणजी महापालिकेवर सत्ता कुणाची मंत्री बाबूश मोन्सेरात यांची की उत्पल पर्रीकर यांची हे ठरणार आहे. भाजपने पाठिंबा दिलेल्या मोन्सेरात यांच्या प्रोग्रेसीव पणजी पॅनलला पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय आम्ही पणजीकर पॅनल कडी टक्कर देत आहे.

आज सकाळी मतपत्रीकेद्वारे मतदान सुरु होताच दुपारी 12 पर्यंत 33.64 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 62.24 टक्के मतदानाची नोंद झाली. मात्र शेवटच्या तासात जास्त मतदान होईल ही शक्यता फोल ठरलीव अंतीम मतदान 69.07 टक्केवर थांबले. पणजीकरांनी मतदारांनी दिलेला कौल नेमका कुणाच्या पदरात पडणार याची उत्सुकता राजकीय विश्लेषकांना लागून राहिली आहे. या निवडणुकीत मोन्सेरात कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.तशीच उत्पल पर्रीकर यांचे राजकीय भवितव्यही पणाला लागले आहे.

पणजी मनपाच्या 30 प्रभागांसाठी एकूण 69 उमेदवार रिंगणात आहेत. 23 प्रभागांत दुहेरी, 6 प्रभागांत तिहेरी तर प्रभाग क्रमांक 26 मध्ये सर्वाधिक 5 उमेदवार आहेत. ताळगांव विधानसभा मतदारसंघात प्रभाग 1 ते 9 येतात तर पणजी मतदारसंघात प्रभाग 10 ते 30 येतात. यापैकी 28.29 व 30 हे तीन प्रभाग रायबंदर येथील आहेत. 2021 च्या मनपा निवडणुकीत 106 उमेदवार रिंगणात होते यावेळी 69 आहेत मतदानही जास्त झाले आहे. 13 रोजी बांबोळी येथील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडीयमवर सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे.

महिला मतदारांची संख्या जास्त

महापालिकेसाठी 15,225 पुरुष व 17,271 महिला अशा एकूण 32,496 मतदारांना मतदानाचा हक्क होता. त्यापैकी 10,575 पुरुषांनी व 11,870 महिलांनी असा प्रकारे 32,496 पैकी 22,445 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे महिलाच पणजी महापालिकेवर सत्ता कुणाची हे ठरवण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त मतदान प्रभाग 23 मध्ये 81.20 टक्के झाले तर सर्वात कमी मतदान प्रबाग क्रमांक 3 मध्ये 53.09 टक्के झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT