Fraud Case Pudhari
गोवा

Panaji fraud case: अनोळखी महिलेशी मैत्रीच्या नादात गमावले 15 लाख

कर्नाटकातील महिलेचा गुजरातमधील व्यावसायिकाला पणजीत गंडा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : अनोळखी महिलेशी मैत्री करणे एका पर्यटकाला चांगलेच भोवले. अचानक झालेल्या मैत्रीच्या नादात त्याने क्षणिक सुखासाठी चक्क 15 लाख 40 हजार रुपये गमावले.

कर्नाटकातील महिलेने गुजरातमधील व्यावसायिकाला पणजीत दारू पाजून गंडा घातल्याची घटना घडली. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून तिने पलायन केले. याप्रकरणी तोमेश (वय-30 , रा. घर क्र. 38, श्यामविला सोसायटी, झवेरी फार्म समोर, काठेवाडा, अहमदाबाद, गुजरात) यांनी पणजी पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रूपाश्री सी. कार्तिक एस.(रा. 309, ल्हिता साऊथ ॲव्हेन्यू, तिसरा मजला, नं-70, दुसरा क्रॉस, 12 वा मेन रोड, आयसीआयसीआय बँके जवळ, उत्तरहळ्ळी, बंगळुरु, कर्नाटक) हिने तक्रारदाराशी मैत्री केली आणि त्याला एकत्र वेळ घालवण्यासाठी व एकांतासाठी हॉटेलची खोली बुक करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर संशयित महिलेने तक्रारदाराला जबरदस्तीने दारू पाजली, त्यामुळे तो नशेत धुंद झाला आणि बेशुद्ध झाला.

त्यानंतर संशयित महिलेने तक्रारदाराने घातलेला 50 ग्रॅम वजनाचा सोन्याचे कडे, 50 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी आणि 2,40,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 15 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला. याप्रकरणी पणजी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरीक्षक नितीन नाईक पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT