Temperature file photo
गोवा

October Hit Heatwave | गोव्यात 'ऑक्टोबर हिट'चा उग्र रूप; म्हापशात पारा तब्बल 41.4 अंश सेल्सिअसवर

October Hit Heatwave | म्हापशात उष्णतेचा पारा तब्बल 41.4 अंश सेल्सिअसवर

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यभरात 'ऑक्टोबर हिट'चा कहर पाहायला मिळत आहे. राज्यात सरासरी तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. म्हापसा येथे दुपारी २.२९ वाजता तापमानाने तब्बल ४१.४ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला होता. तापमानाचा हा विक्रमी उच्चांक असल्याचे संशोधक डॉ. नंदकुमार कामत यांनी नमूद केले.

राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी जबाबदार यंत्रणांना मात्र शहरातील तापमानाची अचूक नोंद ठेवण्याचीही गरज वाटत नाही, अशी संतप्त टीका डॉ. कामत यांनी केली. पणजी आणि मुरगाव येथील हवामानविषयक आकडेवारीभोवतीच सरकारी यंत्रणांचे लक्ष केंद्रित असल्याने म्हापशासारख्या शहरांतील नागरिकांना त्यांच्या नशिबावर सोडले जात असल्याचा आरोप कामत यांनी केला.

भारतीय हवामानशास्त्र विभाग, राज्य सरकार आणि आरोग्य विभागाकडे स्थानिक पातळीवरील तापमानाची पुरेशी माहितीच नसेल, तर उष्णतेच्या लाटेचा धोका ओळखून नागरिकांना सावध कसे करणार, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

गोमंतकीय जनतेला पावसामुळे दिलासा मिळेल असे वाटत होते. मात्र, कुठेही पाऊस पडला नाही. पणजीतील तापमान आज मंगळवारी ३६.३ डिग्री सेंटिग्रेडच्या आसपास होते. तापमानातील वाढ लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा लवकर सोडण्याची गरज आहे.

नागरिकांनी काय करावे?

  • दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक बाहेर पडणे टाळा.

  • नियमितपणे पाणी प्या; तहान लागण्याची वाट पाहू नका.

  • हलक्या किंवा पांढऱ्या रंगांचे, सैल आणि सुती कपडे वापरा.

  • लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्यांनी काळजी घ्या.

  • चक्कर येणे, गोंधळ होणे किंवा बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT