Goa News 
गोवा

Goa BJP | भाजपला 2027 मध्ये पुन्हा सत्तेवर आणा

Goa BJP | नितीन नवीन : विकसित गोवा २०३७ चे ध्येय साध्य करूया

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

विकसित गोवा २०३७ चे ध्येय साध्य करण्यासाठी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्तेवर आणा. गोव्यात भाजप सत्तेवर आला त्यानंतरच्या निवडणुकीत केंद्रात भाजपला सत्ता मिळाली आहे. गोवा भाजपसाठी लकी आहे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी केले. ताळगाव येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात नवीन बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ, माजी अध्यक्ष विनय तेंडुलकर, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो, क्रीडामंत्री रमेश तवडकर, साबांखात्याचे मंत्री दिगंबर कामत इतर मंत्री, आमदार व प्रदेश समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

नवीन म्हणाले, २०२७ मध्ये भाजप पुन्हा गोव्यात सत्तेवर येणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदासाठी निवड गोव्यातच झाली होती. गोव्यात पक्षाला यश मिळाल्यानंतर केंद्रात मिळते. गेल्या चार निवडणुकीत हे दिसून आले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारसंघातील प्रत्येक बुधवर भाजपला ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवण्याचे लक्ष ठेऊन आत्तापासूनच कामाला लागावे, असेही ते म्हणाले.

भाषणाच्या सुरुवातीलाच माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व अनेक दिग्गज नेत्यांचे स्मरण करून नवीन म्हणाले, गोवा विकसित राज्याच्या दिशेने वाटचाल आहे. तो विकास कायम राहण्यासाठी भाजपची सत्ता पुन्हा यायला हवी. कार्यकर्ता हाच भाजपचा प्राण असल्याचे नवीन म्हणाले.नितीन नवीन यांनी पहाटे योग सेतूवर फेरफटका मारला. भगवान परशुरामांना वंदन केल्यानंतर रेईश मागूस येथे जि.पं. अध्यक्ष रेश्मा बांदोडकर यांच्या घरी नास्ता केला. सभेला येण्यापूर्वी मिरामार येथे जाऊन पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर व माजी मुख्यमंत्री पद्मभूषण मनोहर पर्रीकर यांना श्रध्दांजली वाहिली.

नवीन यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • राज्य आणि देशाच्या निरंतर विकासासाठी राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असणे गरजेचे

  • पक्षाने जसे नियोजन केले आहे ते नियोजन यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकत्यनि काम करावे

  • कार्यकर्ते भाजपच्या वटवृक्षाची मुळे ही मुळे मजबूत हवीत.

  • मनोहर पर्रीकर यांच्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी अंत्योदय तत्त्वावर गोव्याचा विकास केला

  • गोव्यामध्ये दरडोई उत्पन्न हे १ लाख १२ हजारांवरून ३ लाख ५० हजार झाले हा गोव्याचा विकास

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर भारत २०४७ संकल्प पूर्ण करण्यासाठी व विकासासाठी भाजपला मत द्या

  • भाजपला मत म्हणजे विकासाला मत

  • गोव्याच्या मुक्तीला उशीर करणाऱ्यांचा इतिहास गोवेकरांनी जाणावा

  • महिलांना पक्ष संघटनेमध्ये जोडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT