suspended Pudhari News Network
गोवा

Goa Electricity Department | तीन साहाय्यक अभियंत्यांसह नऊ वीज कर्मचारी निलंबित

Goa Electricity Department | खात्यात खळबळ : सेवा शिस्तभंगाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

वीज खात्यातील कामामध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून तीन साहाय्यक अभियंटे, तीन कनिष्ठ अभियंटे, दोन लाईनमन व एक हेल्पर मिळून नऊ जणांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे वीज खात्यात खळबळ माजली आहे.

दक्षता खात्याचे संचालक अमरसेन राणे यांनी वीज खात्यातील तीन साहाय्यक वीज अभियंत्यांना निलंबित केले. त्यामध्ये इम्लेश गावकर (सांगे विभाग), विक्रम कारेकर (वास्को विभाग) व सूरज पालेकर (वेर्णा विभाग) यांचा समावेश आहे. याशिवाय सांगेमधील एक कनिष्ठ अभियंता, एक लाईनमन व एक हेल्पर, वास्कोतील एक कनिष्ठ अभियंता, आगशी येथील एक कनिष्ठ अभियंता व एक लाईनमन यांच्या निलंबनाचा आदेश वीज खात्याच्या मुख्य अभियंत्यांनी जारी केला आहे.

सेवा शिस्तभंगाशी संबंधित प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध खात्यांतर्गत चौकशीही सुरू करण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे वीज वाहिनीवर काम करताना काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची प्रकरणे घडली आहेत. त्या चौकशीत काही अधिकारी जबाबदार असल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची चौकशी दक्षता खात्याकडे सुरू होती.

चौकशी अहवालावर भवितव्य

सूत्रांच्या माहितीनुसार, काही प्रकरणातील गैरव्यवहार आणि सेवा नियमांच्या कथित उल्लंघनाबाबत प्राथमिक तपासानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. खात्यांतर्गत चौकशीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार असून, चौकशी अहवालाच्या आधारे पुढील शिस्तभंगाची कारवाई निश्चित केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT