पणजी : पुढारी वृत्तसेवा
हडफडे येथील बिर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबमध्ये झालेल्या भीषण आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांसह शेकडो नागरिकांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत नाईट क्लबच्या मालकांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेल्या कुटुंबीयांनी क्लब मालकांसह दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच प्रकरणाचा जलदगती न्यायालयात खटला चालवण्यात यावा अशी ठाम मागणी केली. आंदोलकांनी आपल्या मृत नातेवाईकांचे फोटो हातात धरत सरकार आणि प्रशासनाचे लक्ष या गंभीर प्रकरणाकडे वेधले. पीडित कुटुंबीयांचा आरोप आहे की, क्लब मालकांनी मानवी सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत कोट्यवधी रुपयांच्या व्यवसायिक हितसंबंधांना प्राधान्य दिले. आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजना न करता, नियमांचे उल्लंघन करून क्लब चालवण्यात आल्यामुळेच हा भीषण प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. या दुर्घटनेने देशभरात संतापाची लाट NO BAIL JAIL CBI-ED उसळली असून, जबाबदार व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पीडित कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.