Nashik Gangapur Dam Jal Pujan  
गोवा

Nashik Gangapur Dam Jal Pujan | "चार वर्षांनंतर गंगापूर धरणावर जलपूजन! 'सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्न पार पडू दे', महापौरांचे गोदामाईला साकडे"

Nashik Gangapur Dam Jal Pujan | सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्न पार पडू दे!

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणावर नाशिक महापालिकेच्या वतीने मंगळवारी (दि. २८) पारंपरिक जलपूजन सोहळा उत्साहात पार पडला. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते विधिवत पूजा करून धरणाचे जलपूजन करण्यात आले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्न पार पडू दे, असे साकडे यावेळी महापौरांनी गोदामाईला घातले.

यावेळी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, मनपा आयुक्त मनीषा खत्री, गटनेते श्याम बडे, अजय बोरस्ते, सीमा ठाकरे, केशव पोरजे, भाजप नेते लक्ष्मण सावजी, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रभाग सभापती सुरेश पाटील, समाधान देवरे, नगरसेवक भगवान ढेबले, निवृत्ती इंगोले, प्रवीण जाधव, बाळासाहेब गिते, नगरसेविका अंकिता शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

पूजेचे पौरोहित्य राहुल बेळे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्रीफळ अर्पण करून धरणाच्या जलसंपत्तीप्रति कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमास शहर अभियंता संजय अगरवाल, अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंते बाजीराव माळी, संजय आहेर, गणेश वैद्य, शैलेंद्र जाधव, नदनीत भामरे, सुरक्षा अधिकारी रमेश तांबट, नगरसचिव संजय नेरकर, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

"जलपूजन ही केवळ परंपरा नसून जलस्रोतांप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची आपली संस्कृती आहे. गोदामाई आणि गंगापूर धरण शहराची तहान भागवत असल्याने त्यांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्न पार पडू दे, तसेच हा कुंभमेळा पुढील २५ वर्षांच्या नाशिकच्या विकासाची दिशा ठरवणारा ठरेल, असा मला विश्वास आहे."
— हिमगौरी आहेर-आडके, महापौर, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT