Nana Patekar Pudhari
गोवा

Nana Patekar Passed Away: 'नटसम्राट'ची अकाली एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

Nana Patekar Movie: गमन, प्रहार, अपहरण, राजनीती, अब तक छप्पन, खामोशी अशा चित्रपटांमधून दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप

पुढारी डिजिटल टीम

Nana Patekar Passed Away

पणजी : गमन, प्रहार, अपहरण, राजनीती, अब तक छप्पन, खामोशी, नटसम्राट अशा असंख्य हिंदी- मराठी चित्रपटांमधून दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी निधन झाले. गोव्यातील दोना पावला येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नाना पाटेकर हे कामानिमित्त गोव्यात गेले होते. बुधवारी संध्याकाळी ते गोव्यातील एका कार्यक्रमात उपस्थितही होते. यानंतर नाना पाटेकर दोना पावला येथील निवासस्थानी परतले. गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास नाना पाटेकर यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने गोव्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 5. 20 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असेही डॉक्टरांनी सांगितले.

नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच अवघा महाराष्ट्र हळहळला. त्यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर हे गोव्याच्या दिशेने रवाना झाले. संध्याकाळपर्यंत त्यांचे पार्थिव पुण्यातील निवासस्थानी आणण्यात येईल, असा अंदाज आहे.

नाना पाटेकर यांनी नाटक, चित्रपट आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे देशभरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. नाम फाऊंडेशनतर्फे नानांनी शेतकऱ्यांना केलेली मदत अवघ्या महाराष्ट्राने पाहिली होती. सामाजिक भान जपणाऱ्या अभिनेत्याने अथक मेहनत आणि आगळ्या वेगळ्या अभिनय शैलीने सिनेविश्वात ठसा उमटवला होता.

नाना पाटेकर यांचे गाजलेले चित्रपट

  • गमन (१९७८) — हिंदी चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या भूमिकांपैकी एक.

  • सलाम बॉम्बे! (१९८८) — महत्त्वाची भूमिका; चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी दाद मिळाली.

  • परिंदा (१९८९) — खलनायकी भूमिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार.

  • प्रहार: द फायनल अटॅक (१९९१) — अभिनयासोबत दिग्दर्शनही. गोव्यातीलसंगीत

  • अंगार (१९९२) — प्रभावी खलनायकाच्या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार.

  • तिरंगा (१९९३) — लोकप्रिय देशभक्तिपर चित्रपट.

  • क्रांतिवीर (१९९४) — त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड; सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.

  • अग्निसाक्षी (१९९६) — सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार.

  • खामोशी: द म्युझिकल (१९९६) — संवेदनशील अभिनयासाठी विशेष कौतुक.

  • अब तक छप्पन (२००४) — पोलिस अधिकाऱ्याची भूमिका.

  • अपहरण (२००५) — नकारात्मक भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार.

  • टॅक्सी नंबर ९२११ (२००६) — राघवच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनय.

  • वेलकम (२००७) — उदय शेट्टीच्या विनोदी भूमिकेमुळे त्यांच्या कारकिर्दीला वेगळे वळण मिळाले.

  • राजनीती (२०१०) — राजकीय पार्श्वभूमीवरील चित्रपटातील महत्त्वाची भूमिका.

  • द अटॅक्स ऑफ २६/११ (२०१३) — मुंबई पोलिस अधिकारी राकेश मारिया यांच्या भूमिकेत.

  • नटसम्राट (२०१६) — गणपत बेलवलकर यांच्या भूमिकेतील अभिनयासाठी प्रचंड प्रशंसा; मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या सर्वाधिक लक्षात राहणाऱ्या भूमिकांपैकी एक.

  • आपला माणूस (२०१८) — अभिनेता व निर्माता.

  • काला (२०१८) — तमिळ चित्रपटातील महत्त्वाची भूमिका.

  • द व्हॅक्सिन वॉर (२०२३) — डॉ. बलराम भार्गव यांची भूमिका.

  • वनवास (२०२४) आणि हाऊसफुल ५ (२०२५) अशा चित्रपटांमध्ये भूमिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT