Namrata Marathe |  
गोवा

Namrata Marathe | मूकबधीर असूनही कष्टाच्या बळावर आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या नम्रता मराठे यांची प्रेरणादायी यशोगाथा

Namrata Marathe | माणसाने जन्म कुठे घ्यावा? कसा घ्यावा? कुठल्या परिस्थितीमध्ये घ्यावा? हे काही आपल्या हातामध्ये नसतं.

पुढारी वृत्तसेवा

धावे : पुढारी वृत्तसेवा
माणसाने जन्म कुठे घ्यावा? कसा घ्यावा? कुठल्या परिस्थितीमध्ये घ्यावा? हे काही आपल्या हातामध्ये नसतं. हे सर्व नियतीच्या हातामध्ये असते. परंतु, जन्माला आल्यानंतर आपल्या जन्माचे सार्थक कशाप्रकारे करावे? हे आपल्या हातामध्ये असते. असेच काही अंशिका नम्रता रघुनाथ जोशी यांच्या आयुष्यामध्ये घडलं.

सुख वस्तू घरामध्ये जन्म घेतला. परंतु जन्मतःच पूर्णपणे बोलताही येईना आणि स्पष्टपणे ऐकताही येईना, अशा अवस्थेमध्ये जन्म झाला. परंतु, आई-वडिलांनी किंवा बहीण भावंडांनी कोणीही शारीरिक व्यंगावर तिला दोष न देता तिचे मोठ्या प्रेमाने कुटुंबामध्ये लाडात पालनपोषण झाले.

पुढे दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर मोठा प्रश्न होता की लग्न कोणाशी करून द्यावं किंवा अशा मुलीशी कोण लग्न करेल? परंतु नशिबाने गाठी कुठे मारलेल्या असतात या काही सांगता येत नाही. सत्तरी तालुक्यातील भोंबेडे या गावामध्ये काही अंशिका असेच व्यंग असलेल्या मंदार मराठे यांच्याशी त्यांचा विवाह जुळून आला व नम्रता जोशींचे नम्रता मराठे म्हणून मराठे कुटुंबामध्ये पदार्पण होऊन त्यांच्या नवीन पर्वाला सुरवात झाली.

नम्रता मराठे या अशा एक जिद्दी स्त्री! ऐकण्याच्या क्षमतेवर मर्यादा असतानाही त्यांनी परिस्थितीसमोर हार मानली नाही. उलट, स्वतःच्या कष्टाच्या बळावर त्यांनी आयुष्याला नवी दिशा दिली. लग्नानंतर त्यांचं आयुष्य बदललं आणि त्यांच्या श्रवणक्षमतेशी संबंधित अडचणींनी त्यांच्या जगण्यापुढे नवी आव्हान उभी केली.

दोघेही नवरा-बायको श्रवणक्षमतेचा अभाव असलेले आणि त्यांना जे अपत्य झालं त्यातही श्रवणदोष होता. या परिस्थितीशी संपूर्ण कुटुंबाने लढा दिला आणि मुलाच्या कानांत आयुष्यभरासाठी श्रवणदोषमुक्त होईल म्हणून लाखोंनी रुपये खर्च केले. आज त्यांचा मुलगा उत्तम बोलतो, ऐकतो.

जे आपल्या नशिबी आलं ते मुलाच्या नशिबी येऊ नये यासाठी नम्रता यांनी जीवाचं रान केलं आणि त्यांचं प्रेम, काळजी आणि आई म्हणून केलेल्या अथक प्रयत्नांना यश मिळालं. हा प्रवास केवळ आर्थिक संघर्षचा नव्हता, तर आशा आणि काळजी यांच्यात झुलणाऱ्या एका आईच्या मनाचाही होता. यात नवरा आणि कुटुियांच्या वाटाही मोलाचा आहे. मात्र, या परिस्थितीने त्यांच्या स्वप्नांना पूर्णविराम दिला नाही.

त्यांच्या आई-वडिलांनी, रघुनाथ आणि स्मिता जोशी यांनी त्यांना शिकवलेली जिद्द, आत्मविश्वास आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची प्रेरणा त्यांच्या सोबत होती. नम्रता यांच्या आयुष्यात शिक्षणाने महत्त्वाची भूमिका बजावली. नम्रताचं शिक्षणही सहजसोपं नव्हतं.

कर्णबधिरा मुलांसाठीच्या लोकविश्वास प्रतिष्ठानच्या शाळेत पहिली ते तिसरीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर सरकारी शाळेत चौथी ते दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. नम्रता यांच्या एकूण जीवन प्रवासावरून परिस्थितीशी लढणारी ती अबला नसून अष्टभुजाधारी दुर्गाच आहे.

स्वावलंबनाचा ध्यास अन् स्वतःचा व्यवसाय

शिक्षकानंतर नम्रताने शिवणकामाचं प्रशिक्षण घेतलं. शिलकर शॉपमध्ये दोन वर्षां काम करताना तिला प्रत्यक्ष अनुभव मिळाला. स्वतातील कौशल्य ओळखून त्याला मेहनतीची जोड दिली. २०१७ मध्ये तिने स्वतःचा टेलरिंग व्यवसाय सुरू केला. ग्राहकांशी संवाद साधून त्यांच्या गरजा समजून घेऊन वेळेत काम पूर्ण करणं आणि गुणवत्तेवर विश्वास निर्माण करणं, या सगळ्या गोष्टींसाठी तिला मेहनत घ्यावी लागली. श्रवणक्षमतेशी संबंधित मर्यादा असूनही तिने या आव्हानांवर मात करण्याचा प्रयत्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT