RG MLA Viresh Borkar  
गोवा

MLA Viresh Borker | आमदार बोरकर यांची अजय खोलकर यांना सहा कोटींची अब्रु नुकसानीची नोटीस

MLA Viresh Borker | तीन दिवसांत जाहीर माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टीचे आमदार वीरेश बोरकर यांनी पक्षाचे माजी खजिनदार अजय खोलकर यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईचा बगाडा उगारला आहे. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप, आर्थिक गैरव्यवहाराचे दावे आणि मानहानिकारक वक्तव्य केल्याप्रकरणी बोरकर यांनी खोलकर यांना सहा कोटी रुपयांची अब्रुक नुकसानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे.

या नोटिसद्वारे अजय खोलकर यांना तीन दिवसांचा अंतिम अल्टीमेटम देण्यात आला असून, तीन दिवसांत माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. फौजदारी अब्रुक नुकसानीचा खटला दाखल करून कायद्यानुसार कमाल दोन वर्षांच्या शिक्षेची मागणी केली जाईल.

वैयक्तिक मानहानी, प्रतिमेचे नुकसान आणि सार्वजनिक प्रतिमेला पोहोचलेल्या धक्क्यापोटी सहा कोटी रुपयांचा नागरी अब्रुक नुकसानीचा दावा दाखल केला जाईल. तसेच संपूर्ण प्रकरणातील कायदेशीर खर्च खोलकर यांच्याकडून वसूल केला जाईल, असे नोटिसमध्ये म्हटले आहे.

राजकीय टीकेचे स्वागतच...

आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, लोकशाहीत राजकीय टीका-टिप्पणीचे स्वागतच आहे. तो लोकशाहीचा भाग आहे; मात्र राजकारणाच्या नावाखाली बिनबुडाचे आरोप करणे आणि वैयक्तिक चरित्र्यहनन करणे कधीही सहन केले जाणार नाही.

बोरकर यांची राजकीय कारकीर्द संपविणार : अजय खोलकर

रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टी (आरजी) च्या खात्यातून २४ लाख रुपये काढल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना पक्षाचे माजी खजिनदार अजय खोलकर यांनी आमदार वीरेश बोरकर यांची राजकीय कारकीर्द संपविण्याचा इशारा दिला.

आरजीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सर्वपक्षीयांना चिंबल येथे आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिउत्तर म्हणून खोलकर हे चिंवलमधील ग्रामस्थांसह घरी उपस्थित होते. खोलकर म्हणाले, आरजीच्या खात्यातून २४ लाख रुपये चोरी केल्याचा आरोप करणाऱ्या आमदार वीरेश बोरकर यांनी पुरावे सादर करावेत.

ज्या वक्तव्यावरून माझ्यावर टीका केली जात आहे, त्याची सुरुवात संबंधित महिलेने केली होती. मी तिला ओळखतदेखील नाही. तरीही मी माफी मागितली होती. माझे आक्षेपार्ह छायाचित्र व्हायरल केले जात आहे, असेही म्हणाले. पक्षाचे खजिनदार असताना पक्षाच्या बँक खातात आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप खोलकर यांच्यावर होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT