पणजी : पुढारी वृत्तसेवा
मिरामार येथील इनडोअर स्टेडियम परिसरात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी केरळचा प्रदीप यू. उर्फ उन्नीकृष्णन बडक्कनचेरी (वय २५) या तरुणाला अटक केली आहे.
याप्रकरणी १७ डिसेंबर रोजी अजय प्रसाद (तिवरेमार्सेल) यांनी पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, १६ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे १२.५८ वाजण्याच्या सुमारास मिरामार येथील इनडोअर स्टेडियम परिसरात एका अज्ञात पुरुषाने अश्लील कृत्य केले.
या प्रकारामुळे संबंधित तरुणीचा विनयभंग झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पणजी पोलिस स्थानकात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तपासासाठी विशेष पथक स्थापन करून व आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली आहे.
अटक करण्यात आलेला संशयित प्रदीप यू. उर्फ उन्नीकृष्णन बडक्कनचेरी (वय २५) मूळचा भगवती बारंपू, कन्नमपरा, अल्कलतबूर, पालक्काड, केरळ येथील रहिवासी आहे. सध्या तो पणजी येथील मधुबन सेंटर स्ट्रीट येथे वास्तव्यास होता. ही कारवाई पणजी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या पोलिस नेतृत्वाखाली उपनिरीक्षक साहीन शेट्ये, पोलिस कॉन्स्टेबल मिणेश नाईक व सुरेश नाईक यांनी केली.