Subhash Shirodkar  
गोवा

Goa Minister Inspection | स्वतःला बॉस समजू नका! मंत्री सुभाष शिरोडकरांच्या अचानक भेटीने सरकारी कार्यालयात उडाली तारांबळ

Goa Minister Inspection | स्वयंला बॉस समजू नका; कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पणजी (पुढारी वृत्तसेवा):

स्वतःला बॉस समजू नका, कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जलस्रोत मंत्री सुबाष शिरोडकर यांनी कर्मचाऱ्यांना दिला. सरकारी कर्मचारी स्वतःला बॉस समजून जनतेला दुय्यम वागणूक देतात. कार्यालयात वाटेल तेव्हा येणे, वाटेल तेव्हा जाणे आणि मनाप्रमाणे रजा घेणे, असे प्रकार सुरू असल्यास जनतेची कामे कशी होणार, असा सवालही त्यांनी केला.

मंत्री शिरोडकर यांनी बुधवारी सकाळी ९.३० वाजता डिचोली येथील जलस्रोत खात्याच्या कार्यालयाला अचानक भेट देऊन कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. यावेळी वेळेत कार्यालयात केवळ दोन ते तीन कर्मचारी उपस्थित होते. बहुतांश कार्यालय रिकामे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

सुमारे २० टक्के कर्मचारीच उपस्थित होते. काही कर्मचारी क्षेत्रीय कामासाठी बाहेर गेले होते, तर काही रजेवर असल्याचे सांगण्यात आले. शिरोडकर हे एका कालव्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कार्यालयाला अचानक भेट दिली.

सरकारी कार्यालयात ६० हजार कर्मचारी असूनही फाईलींच्या निपटारा होण्यास विलंब होत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आदल्या दिवशी म्हटले होते. त्यामुळे शिरोडकर यांनी सकाळी लवकर कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची तपासणी केली.

कर्मचारी सकाळी १० किंवा ११ वाजता कार्यालयात येत असतील, तर जनतेची कामे कशी होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कर्मचाऱ्यांनी काम करण्याची मानसिकता बदलावी, अन्यथा कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT