पणजी : भाजप व मगो पक्षाची युती आहे. त्यामुळे आगामी जिल्हा पंचायत निवडणूक मगो-भाजप युतीनेच लढवणार असल्याची वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. शुक्रवारी जिल्हा पंचायत निवडणुकीसंदर्भात बोलताना मंत्री ढवळीकर म्हणाले, लवकरच भाजप आणि मगो पक्षाची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.
या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाईल. मंत्री ढवळीकर म्हणाले, स्व. मनोहर पर्रीकर यांच्या दूरद़ृष्टीमुळे आजचा गोव्याचा राजकीय आणि विकासात्मक चेहरा घडला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्षम नेतृत्व निर्माण करणे, ग्रामीण भागाचा विकास आणि जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मार्गी लावणे हा युतीचा उद्देश आहे.