पणजी : पुढारी वृत्तसेवा
दऱ्याच्या सणाणिमित्त राज्यातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सणाचा उत्साह, खरेदीसाठी शुभ मानला जाणारा दसऱ्याचा मुहूर्त आणि सोन्याच्या दरातील घसरण यामुळे ग्राहकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. सराफी दुकानांसह कपड़े, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन आणि घरगुती वस्तूंच्या दुकानांमध्येही ग्राहकांची लगबग वाढली आहे.
परंपरेप्रमाणे विजयादशीचा सण मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. अनेकांकडून नवीन संकल्प करत सिमोलंघन होणार आहे. सोने-चांदीच्या खरेदीला तेजी येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गोवा ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर कुडतरकर यांनी दिलेला माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत १६ हजार रुपयांपर्यंत पोहोचलेला २४ कॅरेट सोन्याचा दर सोमवारी प्रति १० ग्राम सुमारे १,४९,५०० रुपयांवर आला. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्राम १,३८,५०० रुपये नोंदवण्यात आला. चांदीच्या दरातही घट झाली असून, पूर्वी प्रति १० ग्राम ३ हजार रुपयांपर्यंत गेलेली चांदी आता २,०१० रुपयांवर आली आहे. दरातील या घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
दसरा आणि दिवाळीच्या स्वागतासाठी पणजीसह राज्यभरातील सराफा व्यवसायिकांनी दुकानें आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने सजवली आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध दुकानांत विशेष सवलती आणि आकर्षक ऑफर्सही जाहीर करण्यात आल्या आहेत.
त्यासोबतच इतर फुलांप्रमाणे झेंडू फुलांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी करण्यात आली होती. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठीही काही ग्राहक दसऱ्याचा मुहूर्त साधत आहेत.