Jewellery Theft (Pudhari Photo)
गोवा

Gold Jewellery Theft | गोव्यात धक्कादायक प्रकार! वडिलांच्या विश्वासाला तडा? आईचे दागिने परस्पर विकणाऱ्या मुलाविरुद्ध गुन्हा

Gold Jewellery Theft | आईच्या निधनानंतर तिचे सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी वडिलांनी मुलाकडे दिले होते.

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

आईच्या निधनानंतर तिचे सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी वडिलांनी मुलाकडे दिले होते. मात्र, मुलाने वडिलांच्या परवानगीशिवाय ते दागिने मडगाव येथील सराफाकडे विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विक्रीतून मिळालेले २३ लाख ५५ हजार रुपये मुलाने स्वतःच्या वापरासाठी खर्च केल्याचा आरोप असून, याप्रकरणी मडगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

आके-बायश येथील बाबुराव नानोस्कर यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांनी दिवंगत पत्नीचे सोन्याचे दागिने २४ जुलै २०२६ पूर्वी मुलगा सर्वेश नानोस्कर याच्याकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते. मात्र, सर्वेश याने वडिलांना कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि परवानगी न घेता ते दागिने मडगाव येथील एका सराफाकडे विकले.

त्यातून मिळालेली २३ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम वडिलांकडे जमा करण्याऐवजी स्वतःच्या वैयक्तिक गरजांसाठी खर्च केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे मडगाव पोलिसांनी सर्वेश नानोस्कर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक संजय वेळीप पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT