Social Welfare Department Goa 
गोवा

Social Welfare Department Goa |मडगावात गोवा फॉरवर्डला 'मोठा' धक्का! बनावट जात दाखला प्रकरणी नगरसेविका पूजा नाईक अपात्र

Social Welfare Department Goa | बनावट दाखला भोवला; गोवा फॉरवर्डला धक्का

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

आगामी पालिका निवडणुकीच्या माध्यमातून राजकीयदृष्ट्या मडगावात प्रवेश करण्यासाठी सज्ज झालेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाला जबरदस्त धक्का बसला आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या चिन्हावर दोनवेळा निवडून आलेल्या मडगाव नगरपालिकेच्या प्रभाग चार मधील नगरसेविका पूजा नाईक यांना बनावट जात दाखला प्रकरणी राज्य सरकारच्या समाज कल्याण खात्याने अपात्र ठरवले आहे.

पालिका निवडणुकीच्या तोंडावर असताना समाज कल्याण खात्याचा हा आदेश गोवा फॉरवर्ड पक्षासाठी धक्कादायक मानला जातो. नगरसेविका पूजा नाईक यांनी गोवा फॉरवर्ड मधून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती.

पहिल्याच प्रयत्नात त्या मडगाव नगरपालिकेच्या फातोर्डा मधील प्रभागातून नगरसेवक पदी निवड झाल्या होत्या. २०२१ मध्ये त्यांनी प्रभाग चार मधून पुष्पा विर्डीकर यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्या दुसऱ्यांदा नगरसेवकपदी निवडून आल्या होत्या.

त्यांनी ही निवडणूक लढवण्यासाठी त्या ओबीसी असल्याचा पुरावा म्हणून लावलेला दाखला बनावट असल्याचा संशय आल्यामुळे पुष्पा विर्डीकर यांनी त्यांच्या जात दाखल्याला समाज कल्याण खात्यासमोर आव्हान दिले होते.

तब्बल साडेचार वर्षांनंतर २६ फेब्रुवारी रोजी समाज कल्याण खात्याने विरडीकर यांच्या आव्हानावर निर्णय देताना पूजा नाईक यांचा तो दाखला बनावट असल्याचे जाहीर केले.

त्या आदेशाच्या प्रती निवडणूक आयोग तसेच पालिका संचालनालयाकडे पाठवण्यात आल्यानंतर पालिका संचालकाने आदेश काढून पूजा नाईक यांना अपात्र ठरवल्याचे जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT