Margao Carnival Parade 2026  
गोवा

Margao Carnival Parade 2026 | मडगावात 15 फेब्रुवारीला रंगणार कार्निव्हलचा उत्साह; सायंकाळी 4 वाजता परेडला होणार सुरुवात

Margao Carnival Parade 2026 | नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांची माहिती : पाच गटांत होणार स्पर्धा

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

मडगाव नगरपालिका कार्निव्हल परेड रविवारी, १५ फेब्रुवारी संध्याकाळी ४ वाजता सुरू होणार असून, रात्री दहा वाजता संपेल. पाच गटांत हे कार्निव्हल परेड होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली. ते म्हणाले, एकूण ८ लाख ३५ हजार रुपयांची बक्षिसे आहेत.

होली स्पिरिट चर्च ते नगरपालिका चौकपर्यंत कारणेबल परेड मार्ग आहे. पारंपरिक गट या पहिल्या गटात प्रथम बक्षीस एक लाख, दुसरे ७५ हजार, तिसरे बक्षीस साठ हजार, चौथे बक्षीस ४५ हजार, पाचवे ३० हजार रुपये बक्षीस जाहीर केले असून याच गटात १४ हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षिसे असणार आहेत.

क्लब आणि इन्स्टिट्यूशन गट, प्रथम बक्षीस ६५ हजार, दुसरे ५० हजार, तिसरे बक्षीस ३० हजार, चौथे बक्षीस २० हजार, पाचवे १२ हजार रुपये बक्षीस जाहीर केले असून याच गटात ९ हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षिसे असणार आहे.

फन अँड जंक या गटात प्रथम बक्षीस २० हजार, दुसरे १८ हजार, तिसरे बक्षीस १० हजार, चौथे बक्षीस साडे आठ हजार, पाचवे ७ हजार रुपये बक्षीस जाहीर केले असून याच गटात ५ हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षिसे असणार आहे.

पारिवारीक गटामध्ये प्रथम बक्षीस २० हजार, दुसरे १८ हजार, तिसरे बक्षीस १० हजार, चौथे बक्षीस साडे आठ हजार, पाचवे ७ हजार रुपये बक्षीस जाहीर केले असून याच गटात ५ हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षिसे असणार आहेत.

क्लाऊन आणि जोकर या गटात प्रथम बक्षीस १५ हजार, दुसरे ११ हजार, तिसरे बक्षीस ८ हजार, चौथे बक्षीस ७ हजार, पाचवे ५हजार रुपये बक्षीस जाहीर केले असून याच गटात ३ हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षिसे असणार आहेत. एकूण आठ लाख पस्तीस हजार रुपयांची बक्षिसे असतील, असेही शिरोडकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT