Cyber Fraud Case (Pudhari File Photo)
गोवा

Cyber Fraud Case Goa | नुवे येथील युवकाला 1.85 लाखाला ऑनलाईन गंडा

Cyber Fraud Case Goa | नुवे, सासष्टी येथील युवकाला १ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मायणा कुडतरी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

नुवे, सासष्टी येथील युवकाला १ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मायणा कुडतरी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नुवे, सासष्टी येथील रहिवासी सुनील कुमार बिंद (३९ वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी आपल्या पूर्वीच्या बँक व्यवहारांची माहिती तपासण्यासाठी गुगलवर स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहक सेवा क्रमांक शोधला होता.

त्यावेळी एका संशयित मोबाईल क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधून स्वतःला एसबीआय बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगितले. संबंधित व्यक्तीने तक्रारदाराला बँक व्यवहारांची माहिती तपासण्यासाठी एक एपीके फाइल डाऊनलोड करण्यास प्रवृत्त केले. तक्रारदाराने ती फाइल डाऊनलोड करताच सायबर भामट्याने त्यांच्या खात्यात प्रवेश मिळवून फसवणुकीच्या हेतूने १ लाख ८५ हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT