पणजी : पुढारी वृत्तसेवा
क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉईंट्स रिडीम करून देण्याचे आमिष दाखवत कुंडई येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीची ३ लाख ९ हजार रुपयांची साइबर फसवणूक केल्याप्रकरणी म्हार्दोंळ पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील संशयित मोहम्मद इम्रान याला उत्तर प्रदेशातील लखनौ येथून केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने क्रेडिट कार्डधारकांना रिवॉर्ड पॉईंट्स रिडीम करून देण्याचे आमिष दाखवून कुंडई येथील ४५ वर्षीय रहिवाशाला आपल्या जाळ्यात ओढले. या माध्यमातून त्याने संबंधित व्यक्तीची ३ लाख ९ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास करताना म्हार्दोंळ पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधाराने संशयिताचा माग काढला आणि लखनौ येथे कारवाई करून त्याला अटक केली.