Goa Crime News  Pudhari File Photo
गोवा

Goa Crime News | म्हापसा आंतरराज्य बसस्थानकावर गोवा गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 10.754 किलो गांजा जप्त!

Goa Crime News | गुन्हे शाखेच्या पथकाने २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.१९ ते रात्री ९.२५ वाजण्याच्या दरम्यान म्हापसा येथील आंतरराज्य बस स्थानकावर कारवाई करून १०.७५४ किलो गांजा (किंमत अंदाजे १० लाख ५० हजार रुपये) जप्त केला.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गुन्हे शाखेच्या पथकाने २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.१९ ते रात्री ९.२५ वाजण्याच्या दरम्यान म्हापसा येथील आंतरराज्य बस स्थानकावर कारवाई करून १०.७५४ किलो गांजा (किंमत अंदाजे १० लाख ५० हजार रुपये) जप्त केला.

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास देयकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी सहायक पोलिस उपनिरीक्षक श्रीराम साळगावकर, पोलिस काॉन्स्टेबल कृतेश किणळकर, रुपेश गावडे, प्रकाश उतकुरी, श्रीकृष्ण माडकर, महिला काॉन्स्टेबल करिश्मा गुडगेरी यांच्या पथकाने संशयितांवर छापा टाकला.

या कारवाईत गोकुळा जेना (वय २४, रा. देउला, ओडिशा), तसेच १७ वर्षीय बालक (रा. ओडिशा) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या खांद्यावरील बॅग व हातातील ट्रॉलीमध्ये हिरवट रंगाचे फुलोरे व फळधारी भाग असलेला गांजा लपवून ठेवलेला आढळला.

गोकुळा जेना याने अल्पवयीन मुलाचा वापर अमली पदार्थ वाहून नेण्यासाठी अथवा पुरवठ्यासाठी केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. जप्त केलेला गांजा शोध व जप्ती पंचनाम्यानुसार ताब्यात घेण्यात आला.

याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिस स्थानकात एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम २२ (बी)(२)(बी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देयकर करीत असून, पोलिस अधीक्षक जीवबा दळवी आणि पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT