polluted river water pudhari photo
गोवा

Mandovi River Pollution | मांडवी नदीतील प्रदूषण कायम; उच्च न्यायालयाचे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला कडक निर्देश

Mandovi River Pollution | प्रदूषणाचे स्रोत शोधण्याचे उच्च न्यायालयाचे 'प्रदूषण नियंत्रण'ला निर्देश

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मळा तलाव आणि मांडवी नदीतील प्रदूषणासंदर्भातील जनहित याचिकेवर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर अंतरिम अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, मांडवी नदीतील फिकल कोलिफॉर्म जिवाणूंची पातळी अद्यापही उच्च असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मळा तलाव आणि मांडवी नदीतील प्रदूषणाची कारणे तसेच त्यावरील उपाययोजनांचा आढावा या जनहित याचिकेद्वारे घेतला जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अंतरिम अहवालातून मांडवी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर स्थिती कायम असल्याचे समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने अमिकस क्युरी (न्यायालयाचे सहाय्यक) आणि गोवा सरकारला प्रदूषणाचे नेमके स्रोत शोधून ते रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतचा अहवाल न्यायालयाच्या रेकॉर्डवर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मळा तलावातील सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याने आणि पाण्यातील प्राणवायूची पातळी खूपच कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT