Theft Burglary Pudhari
गोवा

Goa Theft News | मडगावात तीन दुकाने फोडली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या मालाचा आकडा सुमारे ७५ हजार आहे

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : मध्यरात्री मडगाव बाजारपेठेतील तीन दुकाने फोडून दुकानातील साहित्य आणि रोख रक्कम मिळून सुमारे ७५ हजार रु.चा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर घडलेल्या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी कुडचडेत चोरीच्या दोन घटना घडल्या होत्या. एका घटनेत मंदिरातून दानपेटी फोडण्यासह चोरांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले होते. मंदिराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडावर मास्क बांधलेल्या एका चोराची छबी दिसून आली होती. मात्र, मडगावातील घटनेत एका दुकानामधून प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकूण ५ जण चोरी करत असल्याचे समोर आले आहे. मडगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानाबरोबर प्लास्टिक आणि कपडे विकणाऱ्या दुकानांची शटरे वाकवून चोरांनी ऐवज आणि रोकड चोरून नेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या मालाचा आकडा सुमारे ७५ हजार एवढा आहे.

ठसे, श्वान तज्ज्ञांना अपयश

मडगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. चोरांचा माग काढण्यासाठी ठसे व श्वान तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. मात्र, फारसे हाती लागू शकले नाही. इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाच चोर चोरी करताना दिसून आले आहेत. पोलिसांनी चोरांना पकडण्यासाठी विविध दृष्टिकोनातून तपास सुरू केलेला आहे.

कमराळ येथील मंदिरात ५० हजारांची चोरी

मडगाव : कमराळ कुडचडे येथील साईबाबा मंदिरात मध्यरात्री अज्ञात चोरट्याने मागील दरवाजा फोडून प्रवेश करत देणगी पेटीतील सुमारे ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे भाविक व ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. २ रोजी पहाटे सुमारे १२.२३ च्या सुमारास चोराने मंदिराच्या मागील बाजूचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. देणगीपेटी फोडून त्यातील रोकड घेऊन आरोपी पसार झाला. सकाळी मंदिर उघडण्यासाठी गेलेल्या व्यवस्थापनाला दरवाजा तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने चोरीचा प्रकार उघड झाला आहे. नुकतेच मंदिराचे लोकार्पण झाले होते. कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांच्या प्रयत्नातून उभ्या झालेल्या मंदिराच्या व्यवस्थापनावरून सध्या वाद सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT