डिचोली : पुढारी वृत्तसेवा
शिरोडवाडी मुळगाव डिचोली येथे हमरस्त्यावरून दुचाकीने जात असताना रस्ता ओलांडणाच्या नादात बिबट्याने दुचाकीवर उडी टाकल्याने दिगंबर नाईक हा दुचाकाकीस्वार जखमी झाला. तसेच त्याच्या दुचाकीचे नुकसान झाले.
रात्री ८ च्या दरम्यान ही घटना घडली. या हल्ल्यात दिगंबर नाईक मुळगाव यांच्या हाताला व पायाला जखम झाली. जखमीवर डिचोली आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले. मूळगाव परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने वाढलेला असून काही दिवसांपूर्वी या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे. मात्र बिबट्याचा वावर लोकवस्तीत सुरूच आहे. लोकांनी धास्ती घेतलेली असून सर्रासपणे हमरस्त्यावरून बिबटा क्रॉस होत असल्याने अपघात घडण्याची भीती व्यक्त होत आहे.