Panaji Market Pudhari File Photo
गोवा

Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

Panaji Market Lemon | पणजीत उष्णतेचा कडाका वाढल्याने दरांमध्ये वाढ : अन्य भाज्यांचे दर स्थिर

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजी बाजारात भाज्यांचे दर स्थिर असले, तरी लिंबू आणि शहाळ्याचे दर वाढले आहेत. एरवी ४ ते ५ रुपयांना मिलणारा लिंबू आता १० रुपयांवर पोहोचला आहे, तर शहाळ्याचा दर ५० रुपयांवरून ७० रुपयांवर गेला आहे. पावसाने दंडी मारल्याने आणि उष्णतेचा कडाका वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे गारवा मिळवण्यासाठी लिंबू सरबत आणि शहाळ्याच्या पाण्याला पसंती दिली जात आहे.

पणजी बाजारात शहाळ्याच्या दरात प्रतिनग १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतीची मागणी वाढते. घरगुती वापरासह रसंवतीगृहे, खाद्यपदार्थ विक्रेते आणि सरबत विक्रेत्यांकडूनही लिंबांची खरेदी केली जाते.

मात्र, दरवासीमुळे ग्राहकांसह सरबत विक्रेत्यांनाही अधिक खर्च करावा लागत आहे. पूर्वी २० रुपयांत तीन ते चार लिंबू मिळत होते. आता एका लिबासाठी १० रुपये मोजावे लागत आहेत. वाढती मागणी आणि कर्नाटकातील घाऊक बाजारातील वाढलेल्या किमती यामुळे लिंबू आणि शहाळ्याचे दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

पणजी बाजारातील दर (रु.)

  • कांदा: ५० ते ६० रु.

  • बटाटा: ४० रु.

  • टोमॅटो: ३० रु.

  • चिटकी: ८० रु.

  • भेंडी: ६० रु.

  • वालपापडी: ८० रु.

  • कोबी: ३० रु.

  • फ्लॉवर: ४० रु.

  • पुदिना: १० रु.

  • कोथिबीर (जुडी): २० रु.

  • वाल (जुडी): ३० रु.

  • मुळा: ३० रु.

  • हळसाण्याची पाने: ५० रु. (तीन जुड्या)

  • पालक: १० रु.

  • गावठी वांगी: ३० रु. (नग)

  • टेंडली: ५० रु. (वाटा)

  • गावठी चिटकी: ५० रु. (वाटा)

  • आंबाडे: ५० रु. (१२ नग)

  • उकडा तांदूळ: ७० ते १०० रु. किलो

फलोत्पादनकडील दर (रु.)

  • कांदा: ५८ रु.

  • बटाटा: २९ रु.

  • टोमॅटो: २४ रु.

  • भेंडी: ५८ रु.

  • गाजर: ४३ रु.

  • कोबी: २२ रु.

  • फ्लॉवर: ३६ रु.

  • चिटकी: ४३ रु.

  • वालपापडी: ७० रु.

  • मिरची: ६७ रु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT