जमीन हडपप्रकरणी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा File Photo
गोवा

जमीन हडपप्रकरणी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

हणजूण कोमुनिदाद अधिकार्‍यांची बनावट स्वाक्षरी, कागदपत्रे

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : हणजूण कोमुनिदादच्या मालकीचा 2 लाख चौ.मी. जमिनीचा तात्पुरता ताबा बनावट प्रमाणपत्र करून या जागेतील 20 हजार चौ.मी. भूखंडाची विक्री केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयित यशवंत सावंत व मीनाक्षी सावंत (रा.आसगाव) यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

या प्रकरणी हणजूण कोमुनिदादचे अ‍ॅटर्नी सेबीस्तीयन डिसोझा यांनी म्हापसा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, संशयित आरोपींनी संगनमताने हणजूण कोमुनिदादची सर्व्हे क्र. 498/1 व 496/1-ए मधील दोन लाख चौ.मी. जमिनीच्या 1952 मधील हंगामी ताबा प्रमाणपत्र, सीमांकन कार्यवाही पत्र, आदेश पत्र आणि 1958 च्या अंतिम ताबा प्रमाणपत्र बनावट करून त्यावर कोमुनिदादच्या अधिकार्‍यांची बनावट स्वाक्षरी आणि हस्तलिखिताची नक्कल केली. त्यानंतर ही जमीन आपल्या मालकीची असल्याचे संबंधित सरकारी अधिकार्‍यांना भासवले. तसेच 2019 मध्ये बार्देश उपनिबंधक (सबरजिस्ट्रार) कार्यालयामार्फत या दोन लाख जमिनीतील 20 हजार पेक्षा जास्त चौरस मीटरचा भूखंड एका परप्रांतीय व्यक्तीला विकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT