पणजी: पुढारी वृत्तसेवा: नाताळ व नववर्षाच्या निमित्ताने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर (Konkan Railway) तीन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीचे बुकिंग १४ डिसेंबरपासून सुरू होईल, अशी माहिती कोकण रेल्वेमार्फत देण्यात आली आहे. गाडी क्र. ०११५१ मुंबई सीएसएमटी ते करमाळी स्पेशल (दैनिक) ही गाडी २० डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत मुंबई सीएसएमटी येथून दररोज ००.२० वाजता सुटेल व त्याच दिवशी १३.३० वाजता करमळीला पोहोचेल.
गाडी क्र. ०११५२ करमळी ते मुंबई सीएसएमटी स्पेशल (दैनिक) ही गाडी करमळी येथून २० डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत दररोज १४.१५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. ही २२ डब्यांची गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिवी स्थानकावर थांबेल. (Konkan Railway)
रेल्वे क्रमांक ०१४६३ लोकमान्य टिळक (टी) ते कोचुवेली स्पेशल (साप्ताहिक) ही गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून दर गुरुवारी म्हणजे १९ डिसेंबर, २६ डिसेंबर, २ जानेवारी व ९ जानेवारी रोजी १६:०० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी २२.४५ वाजता कोचुवेलीला पोहोचेल. रेल्वे क्र. ०१४६४ कोचुवेली ते लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक) ही दर शनिवारी कोचुवेली येथून म्हणजे २१ डिसेंबर, २९ डिसेंबर, ४ व ११ जानेवारी रोजी १६.२० वा. सुटेल व तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे ००.४५ वाजता पोहोचेल. २२ डब्यांची ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बायंडूर (एच), कुंदापुरा, उडुपी, सुरथकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं., त्रिशूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जंक्शन स्टेशनवर थांबेल.
गाडी क्रमांक ०१४०७ पुणे जंक्शन ते करमळी विशेष (साप्ताहिक) ही गाडी पुणे जंक्शन येथून दर बुधवारी २५ डिसेंबर, १ जानेवारी व ८ जानेवारी रोजी ०५.१० वाजता सुटेल व त्याच दिवशी २०.२५ वाजता करमळीला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४०८ करमाळी ते पुणे जंक्शन विशेष (साप्ताहिक) करमळी येथून दर बुधवारी म्हणजे २५ डिसेंबर, १ जानेवारी, ८ जानेवारी रोजी २२.०० वाजता सुटेल व दुसर्या दिवशी १३.०० वाजता ही गाडी पुणे जंक्शनला पोहोचेल. १७ डब्यांची ही गाडी चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी स्थानकावर थांबेल.