Fraud Case 
गोवा

Goa Fruad Case | कोल्हापूरच्या दाम्पत्याने गोव्यातील महिलांची केली 1.59 कोटींची फसवणूक

Goa Fruad Case | फॅब्रिक बॅग आणि सॅनिटरी नॅपकिन मशीनच्या नावाखाली गुंतवणूक; गोव्यातील १८ महिलांची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

महिलांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील एका दाम्पत्याने गोव्यातील अनेक महिलांची सुमारे १.५९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओसी) या प्रकरणी महाराष्ट्र महिला उद्योग विकास केंद्र या संस्थेविरुद्ध तसेच संस्थेच्या मालकीण सुमित्रा पाटील आणि त्यांचे पती दत्तात्रय पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

निरंकाल, फोंडा येथील हेमा सालेलकर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पैशांची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून फसवणूक केलेल्या एकूण २२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १८ तक्रारदार महिला आणि चार पुरुष आहेत. ही घटना डिसेंबर २०२५ मध्ये घडली असून हल्लीच एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संशयितांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती ईओसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी महिलांना स्वयंचलित व मॅन्युअल नॉन-वोव्हन फॅब्रिक बॅग बनविण्याच्या मशीन, हेअरबँड कटर मशीन, सॅनिटरी नॅपकिन उत्पादन यंत्रे आदी मशिनरी खरेदीसाठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.

महिलांना स्वयंरोजगार आणि सक्षमीकरणाचे आश्वासन देत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यांनी स्वतःला महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत पात्र व्यावसायिक व उद्योजक म्हणून खोटे सादर केल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT