मडगाव : धुलगाळ-लोलये काणकोण येथे एका घरावर छापा मारून जुगार खेळणार्या 40 संशयितांना पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्यांना अटक केली. कारवाईत सुमारे दीड लाख रुपये रोख रक्कम आणि 40 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, धुलगाळ-लोलये येथील एका घरावर सोमवारी रात्री छापा टाकून पत्ते खेळणार्या कुमठा-कारवार येथील 40 जणांना काणकोण पोलिसांनी अटक केली. सुमारे 5.20 लाख रुपये रोख, संगणक, 40 मोबाईल फोन व गाड्या जप्त केल्या. लोलये येथील घरात जुगार चालत असून कर्नाटकातून बरेच लोक तिथे पत्त्यांचा जुगार खेळण्यासाठी आल्याची माहिती त्या इसमाने दिल्यानंतर काणकोण पोलिसांचे पथक या ठिकाणी पाठविण्यात आले असता पहाटे उशिरापर्यंत तिथे पत्त्यांचा जुगार जोरात चालू असल्याचे दिसून आले. या घरात असलेल्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पहाटे सव्वा तीन वाजता सुरू झालेली ही कारवाई सकाळी 6.30 पर्यंत चालू होती. नंतर सकाळी 9.45 वा. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.
या कारवाईत महेंद्र नाईक, प्रशांत नाईक, आनंद नाईक, पूर्णेश्वर शिमागो, सुधाकर नाईक, नागराज नाईक, रॉनी फर्नांडिस, राज शिमोगा, नागराज नायक, पांडुराज गावडा, संतोष गावकर (कुमठा), जगदीश गावडा, सुप्राय गावडा, कविराज नाईक, विशाल असूलकर, इर्शाद मुल्ला, नितीन पालेकर, नारायण नाईक, परमेश नाईक, अल्बक्स हिराली, विनय नाईक, बलराज गावडा, रवी शेट्टी, गजानन पडते, संतोष गावकर (अंकोला), मंजुनाथ नायक, सुरेश अपरनू, गौतम कामत, अशोक शेठ, धनराज नायक, नवीन नायक, राघवेंद्र रायकर, मोदीन मथाड, शांतन सिद्दी, मानतेश हरिजन, सुनील भोटके, मोहम्मद शेख, राघवेंद्र हरीकंत्रा, प्रशांत तेलेकर यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली.
कारवाई करणार्या पथकात पोलिस उपनिरीक्षक अजित वेळीप, उपनिरीक्षक रामदास दहीफोडे, हवालदार नंदकुमार गोसावी तसेच पोलिस शिपाई रोहन नाईक, सोमेश फळदेसाई, भूषण फळदेसाई, रक्षक देविदास, रोहन देविदास, रुपेश सतरकर, दीपक पागी आणि शिवानंद पागी यांचा समावेश होता. दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास चालू असल्याचे निरीक्षक राऊत देसाई यांनी सांगितले.