Karnataka Minister Driver Death Goa
कळंगुट : येथील एका रिसॉर्टमध्ये कर्नाटकातील एका मंत्र्याचा चालक संदीप सलायम याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तो मूळचा उडुपी येथील रहिवासी होता. मृत्यूचे कारण अस्पष्ट असून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप सलायम हा पणजी येथील एका कॅसिनोमधून एका महिलेसोबत कळंगुटमधील रिसॉर्टमध्ये आला होता. त्यानंतर रिसॉर्टमधील खोलीत त्याचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.