न्यायालय  Pudhari File Photo
गोवा

Calangute Police Officer Attack | "कळंगुट पोलीस निरीक्षकावर हल्ला करणाऱ्या कर्नाटकातील 26 वर्षीय तरुणाला सशर्त जामीन मंजूर!"

Calangute Police Officer Attack | पोलिसांनीच आरोपीची न्यायालयीन कोठडी मागितल्याने त्याला कोठडीत ठेवण्याची आवश्यकता दिसत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने केले.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कळंगुट येथील कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करून शासकीय वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कर्नाटकातील २६ वर्षीय राघवेंद्र सन्नगौडर याला म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनीच आरोपीची न्यायालयीन कोठडी मागितल्याने त्याला कोठडीत ठेवण्याची आवश्यकता दिसत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने केले.

न्यायालयाने आरोपीला २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि त्याच रकमेचा एका स्थानिक सक्षम जामीनदाराच्या हमीसह जामीन मंजूर केला. जामीन अर्जाला सरकारी पक्षाने जोरदार विरोध केला.

कर्तव्यावर असलेल्या कळंगुट पोलीस निरीक्षकावर हल्ला करणे हा गंभीर गुन्हा असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच आरोपीचे गोव्यात कोणतेही स्थानिक संबंध नसल्याने तो फरार होण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आला.

तपास सुरू असताना त्याची सुटका झाल्यास जनतेचा न्यायव्यवस्थवरील विश्वास कमी होईल, असा युक्तिवादही सरकारी पक्षाने केला. आरोपीच्यावतीने ॲड. सलिल लवंदे यांनी बाजू मांडताना, आरोपी हा परराज्यातील असल्याचा मुद्दा जामीन नाकारण्यासाठी कायदेशीर कारण ठरू शकत नाही, असा युक्तिवाद केला. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने नमूद केले की, पोलिसांनी प्राथमिक तपास पूर्ण केला असून आरोपीला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी स्वतः पोलिसांनीच केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT