Suspicious Death Pudhari
गोवा

Goa Resort Suspicious Death | कर्नाटकातील माजी मंत्र्याच्या माजी चालकाचा संशयास्पद मृत्यू

Goa Resort Suspicious Death | व्हिसेरा तपासणीनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

पुढारी वृत्तसेवा

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

एका माजी मंत्र्याचा माजी वाहनचालक तथा मालपे (उडुपी) येथील कर्नाटकातील जलक्रीडा व्यावसायिक संदीप सलायम मालपे यांचा कळंगुट येथील एका रिसॉर्टमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून कळंगुट पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

रिसॉर्टच्या खोलीत संदीप मालपे मृतावस्थेत आढळल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने कळंगुट पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉमध्ये पाठविला.

मात्र शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याने व्हिसेरा तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात विषप्रयोग करून खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असला, तरी फॉरेन्सिक अहवाल येईपर्यंत मृत्यूचे कारण निश्चित सांगता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

तसेच मृताच्या गळ्यातील सोनसाखळीही गायब असल्याचे तपासात समोर आले आहे. संदीप मालपे हे आपल्या भावंडांसह व मित्रांसोबत गोव्यात पर्यटनासाठी आले होते. २९ जून रोजी त्यांनी कॅसिनोला भेट दिली होती.

ती महिला कोण..?

तपासादरम्यान संबंधित महिलेने संदीप यांना सिगारेट दिल्यानंतर काही वेळात ते खाली कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या दाव्याची पोलिसांकडून पडताळणी सुरू असून घटनेनंतर ती महिला बेपत्ता झाली आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT