CM Pramod Sawant pudhari photo
गोवा

Goa Fast Railway Service | काणकोण ते पेणे रेल्वेसेवा प्रस्तावासाठी प्रयत्नशील; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

Goa Fast Railway Service | मुख्यमंत्री प्रमोद सावंत : राज्यांतर्गत जलद रेल्वे जोडणीचा विस्तार करण्याचा विचार

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्याच्या दक्षिण टोकापासून उत्तर टोकापर्यंतचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी काणकोण ते पेणे दरम्यान जलद रेल्वेसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव पुढील कार्यकाळात मांडण्याची सरकारची योजना असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

गोव्याला बंगळुरू आणि मुंबईशी जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस मार्गाच्या कार्यान्वित यशाचा दाखला देत मुख्यमंत्री सावंत यांनी राजयातील अंतर्गत रेल्वे संपर्क अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. गोव्या आणि देशातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या विद्यमान वंदे भारत एक्सप्रेस सेवांना मिळालेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर राज्यांतर्गत जलद रेल्वे जोडणीचा विस्तार करण्याचा सरकारचा विचार आहे.

शेजारील राज्यात प्रवास होणार सुलभ

गोव्याच्या उत्तर आणि दक्षिण भागातील वाहतूक संपर्क मजबूत करण्याबरोबरच शेजारील राज्यांतील प्रादेशिक प्रवास अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीनेही हा प्रस्ताव महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र, या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी पुढील टप्प्यात आवश्यक नियोजन आणि संबंधित पातळीवरील प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

जलद रेल्वेसेवेमुळे दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा यांच्यातील प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल. राज्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा महत्त्वपूर्ण ठरू शकतो. मोपा विमानतळाकडे जाणाऱ्या दक्षिणेतील गोमंतकीयांना त्याचा फायदा होऊ शकतो.

विशेषतःः कामानिमित्त, व्यवसाय, शिक्षण तसेच इतर कारणांसाठी उत्तर-दक्षिण गोव्यादरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा फायदा हो ण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी या जलद रेल्वेसेवेची व्याप्ती कर्नाटकातील कारवारपासून महाराष्ट्रातील सिंधुदुर्गपर्यंत वाढवण्याची शक्यताही व्यक्त केली. कारवार - गोवा - सिंधुदुर्ग असा विस्तारित जलद रेल्वे मार्ग झाल्यास गोव्याबरोबरच शेजारील भागातील प्रवाशांनाही अधिक वेगवान आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT