कला अकादमी 
गोवा

Kala Academy Closure | कला अकादमी १ ऑगस्टपासून होणार पुन्हा बंद !

टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय : तज्ज्ञांनी निदर्शनास आणलेल्या त्रुटींची होणार दुरुस्ती

पुढारी वृत्तसेवा

Kala Academy Closure August 1

पणजी : कला अकादमी इमारतीच्या नूतनीकरणातील त्रुटींवरून गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्स समितीची दहावी बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत नूतनीकरणातील त्रुटी दुरुस्ती करण्यासाठी कला अकादमी १ ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत आयआयटी मद्रासने सादर केलेल्या सविस्तर तांत्रिक अहवालावर विस्तृत चर्चा करण्यात आली. कला अकादमीच्या संपूर्ण परिसराची व इमारतीची पाहणी आयआयटी मद्रासच्या तज्ज्ञ पथकाने काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यानंतर तयार करण्यात आलेला सविस्तर अहवाल यावर्षी सरकारकडे सादर करण्यात आला आहे.

या बैठकीत अहवालातील निरीक्षणे आणि शिफारशींचा आढावा घेण्यात आला. यामध्ये दीनानाथ मंगेशकर सभागृह, कृष्ण कक्ष पूर्णतः कला वर्ग अंशतः बंद करण्यात येणार आहेत. नूतनीकरणाच्या पुढील टप्प्यात आवश्यक असलेली अतिरिक्त कामेही हाती घेण्यात येतील.

साबांखा मंत्र्यांशी बैठक

दरम्यान, पुढील कार्यवाही आणि आवश्यक निर्णयांबाबत चर्चा करण्यासाठी टास्क फोर्सचे अध्यक्ष विजय केंकरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांची भेट घेणार आहेत

अकादमीची सर्व कामे पूर्ण व्हावीत...

टास्क फोर्सचे सदस्य आणि ज्येष्ठ कलाकार देविदास आमोणकर यांनी सांगितले की, कला अकादमीचे संपूर्ण काम पूर्ण व्हावे, अशी भूमिका समितीने यापूर्वीच मांडली होती. मात्र, नूतनीकरणाची सर्व कामे पूर्ण होण्यापूर्वीच अकादमी सुरू करण्यात आली. यानंतर वास्तुविशारद राजन भिसे, ध्वनी यंत्रणा तज्ज्ञ रॉजर ड्रेगो, प्रकाश योजना तज्ज्ञ शीतल तळपदे यांनीही इमारतीची तपासणी करून विविध त्रुटींची नोंद केली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT