आडपई : पुढारी वृत्तसेवा
फोंडा तिस्क येथे मामलेदार कार्यालयासमोर कदंबा (जी ए ०३ X ०४४८) व मारूती (जी ए ०५ D ५०१५) कारची धडक झाली. कदबां कवळेहून फोंड्याला जात होती, तर मारुती कार रवीनगर खडपाबांदहून गावणेला जात होती. एका बाजूला पार्क करून ठेवलेल्या गाडीमुळे ड्रायव्हर दचकला व गाडीवरचा ताबा सुटून हा अपघात झाला.
या अपघातात मारुती कारच्या समोरच्या भागाचे बरेच नुकसान झाले आहे. कदंबा बसचे बंपरचेही नुकसान झाले आहे. अपघातात मारुती कार चालक किरकोळ जखमी झाला आहे. शेवटी फोंडा पोलिसांनी पंचनामा करून रस्ता मोकळा करून दिला.