हैदराबाद : ‘जोयआलुक्कास’चा या वर्षातील सर्वात मोठा दागिन्यांचा सेल जाहीर झाला आहे. या सेलमध्ये खरेदी करणार्या ग्राहकांना सोने, हिरे, प्लॅटिनम, चांदी आणि मौल्यवान रत्नांच्या दागिन्यांच्या खरेदीवर घडणावळीवर 50 टक्के सूट मिळणार आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत मर्यादित कालावधीसाठी ही ऑफर लागू आहे.
या सेलमध्ये पारंपरिक भारतीय दागिन्यांपासून ते आधुनिक इटालियन, टर्किश आणि एथ—ो-मॉडर्न डिझाईन्सचा समावेश आहे. 1 लाखांहून अधिक वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन्सचा संग्रह ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. या घोषणेबद्दल बोलताना जोयआलुक्कास ग्रुपचे चेअरमन डॉ. जोय आलुक्कास म्हणाले, आम्ही ग्राहकांना खरेदीचा उत्तम अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. ‘वर्षातील सर्वात मोठा दागिन्यांचा सेल’द्वारे आम्ही आमच्या ग्राहकांना अतुलनीय किंमत आणि डिझाईनमधील वैविध्य देत आहोत. आम्ही सर्व दागिनेप्रेमींना आमच्या शोरुम्समध्ये भेट देऊन या खास ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन करतो. या ऑफर व्यतिरिक्त प्रत्येक खरेदीवर आयुष्यभर मोफत देखभाल, एक वर्षाचा मोफत विमा आणि परत खरेदीची हमी दिली जात आहे.?