Jose Philip Dsouza  
गोवा

Jose Philip Dsouza | 'दाबोळीतून लढणे ही माझी चूकच होती!'; माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांचे मोठे विधान

Jose Philip Dsouza | दाबोळीतून निवडणूक लढणे चूकच होती

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
माझे मतदार, पाठीराखे आणि हितचिंतक वास्को मतदारसंघात असतानाही २०२२ ची विधानसभा निवडणूक दाबोळी मतदारसंघातून लढविणे ही चूक होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक वास्कोतूनच लढविणार असल्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे नेते जुझे फिलिप डिसोझा यांनी स्पष्ट केले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना डिसोझा यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले की, काँग्रेससोबत आघाडी असल्यामुळे निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे तत्कालीन पक्ष निरीक्षक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या. त्यानंतर आघाडीचा उमेदवार म्हणून दाबोळी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

मात्र, आपले मतदार, पाठीराखे आणि हितचिंतक वास्को मतदारसंघातच राहिल्याने दाबोळीत पराभवाचा सामना करावा लागला. परिणामी, दाबोळीतील लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करता आली नाहीत.

आता वास्कोतून विधानसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह लोकांकडून होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रितपणे निवडणूक लढवावी, अशी लोकांची इच्छा असल्याचेही डिसोझा यांनी सांगितले. त्यानुसार रणनीती ठरवली जाईल.

निवडणूक जिंकण्यासाठी स्वतःचे मतदार तसेच पक्षाचे हितचिंतक आणि मतदार महत्त्वाचे असतात. वास्को मतदारसंघात पूरक वातावरण असल्याचा दावा डिसोझा यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT