423 भूखंडांवर उद्योग उभारणार असल्याचे मुख्यमंत्री सांवत यांनी सांगितले Pudhari News Network
गोवा

औद्योगिक वसाहतींतील विनावापर 423 भूखंडांवर उद्योग उभारणार

पुढारी वृत्तसेवा

पणजी : राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये अनेक भूखंड विनावापर पडून आहे. विनावापर असलेल्या 423 भूखंड नव्या उद्योजकांना देण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकारने ‘एक्झिट सपोर्ट योजना’ मंगळवारी (25 रोजी) जाहीर केली. या योजनेंतर्गत अधिकाधिक उद्योग गोव्यात आणून महसूलप्राप्तीसह रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार सरकारने केला असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिली.

मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड, मुख्य सचिव पुनितकुमार गोयल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये 12.75 लाख चौरस मीटर जमीन विनावापर आहे. अनेक उद्योग बंद आहेत. बंद पडलेल्या उद्योगांना पुन्हा चालना देण्यासाठी तसेच विनावापर पडून असलेल्या 423 भूखंडांवर नवे उद्योग उभारण्यासाठीच उद्योग विकास महामंडळामार्फत ‘एक्झिट सपोर्ट योजना’ जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये राज्याच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे अनेक उद्योजक उद्योग उभारणीसाठी गोव्यात येत आहेत. अशा उद्योजकांना उद्योग विकास महामंडळाच्या या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. या योजनेमुळे सरकारला महसूल मिळण्यासह राज्यात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचेही ते म्हणाले.

औद्योगिक वसाहतींमध्ये अंतर्गत वीज वाहिन्याृ

औद्योगिक वसाहतींमध्ये अनेकदा विजेच्या समस्या निर्माण होत आहेत. त्याचा फटका उद्योगांना बसत असून अनेकदा उत्पादन ठप्प होते. त्यावर मात करण्यासाठी औद्योगिक वसाहतींमध्ये अंतर्गत वीज वाहिन्या घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे काम पुढील दीड वर्षांत पूर्ण केले जाईल, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT