Illegal Dhiryo Bullfight  
गोवा

Illegal Dhiryo Bullfight | कोलव्यात न्यायालयाच्या बंदीला केराची टोपली! बेकायदेशीर धिरयो आयोजित

Illegal Dhiryo Bullfight | बंदीनंतरही रेड्यांच्या झुंजी : पोलिसांची मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
सण-उत्सवाच्या आड सुरू असलेल्या बेकायदेशीर 'धिरयो'च्या प्रकारावर अखेर पोलिसांनी छाप लावला आहे. न्यायालयाच्या बंदीकडे दुर्लक्ष करून कोलवा येथे सार्वजनिक ठिकाणी दोन रेड्यांची झुंज लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोलवा पोलिसांनी अज्ञात आयोजकांविरोधात प्राणी क्रूरता, भारतीय न्याय संहिता आणि जुगारबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

दक्षिण गोव्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कोलवा परिसरात १३ सप्टेंबर रोजी सार्वजनिक ठिकाणी दोन रेड्यांची झुंज आयोजित केली होती. या झुंजीत दोन्ही रेड्यांना एकमेकांवर जीवघेण्या पद्धतीने हल्ला करण्यास प्रवृत्त केले. या झुंजीभोवती मोठ्या प्रमाणात नागरिक आणि प्रेक्षकांची गर्दी जमली होती.

मनोरंजनाच्या नावाखाली हा बेकायदेशीर प्रकार उघडपणे सुरू असल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या झुंजीदरम्यान रेड्यांचा अत्यंत क्रूर छळ करण्यात आला. त्यांना एकमेकांशी झुंज देण्यासाठी चिथावणी देण्यात आली. उपस्थितांकडून या प्रकाराला प्रोत्साहनही मिळत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ प्राणी क्रूरतेपुरता मर्यादित नसून कायद्याचे उघड उल्लंघन असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिल कृष्णा यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्यादी बनून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आयोजक आणि संबंधितांविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम ११(१)(एम)(एन), भारतीय न्याय संहितेच्या कलम १९२ तसेच गोवा, दमण आणि दीव सार्वजनिक जुगारबंदी कायद्याच्या कलम ११ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तांत्रिक पुराव्यांचीही पडताळणी

घटनास्थळावरील व्हिडिओ, छायाचित्रे आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दृश्यांची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. झुंजीचे आयोजन कोणी केले, आर्थिक व्यवहार कोणी केले आणि या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतलेल्या व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT