IFFI Goa 
गोवा

IFFI Goa | समुद्रकिनारा, चित्रपट आणि कलाप्रेम! इफ्फीच्या रंगात रंगली गोव्याची राजधानी पणजी

IFFI Goa | आपले आयुष्य हे प्रेमाच्या एका सुंदर गाण्यासारखे आहे. जशा समुद्राच्या लाटा सतत वाहत राहतात, थांबत नाहीत, तसेच आयुष्यही सतत पुढे वाहत राहणारे आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : उज्ज्वल चंदावार

आपले आयुष्य हे प्रेमाच्या एका सुंदर गाण्यासारखे आहे. जशा समुद्राच्या लाटा सतत वाहत राहतात, थांबत नाहीत, तसेच आयुष्यही सतत पुढे वाहत राहणारे आहे. सिनेमा आपल्याला हेच सांगतो आणि एका छत्राखाली शेकडो किस्सांची मेजवानी म्हणजेच तर मौज. करमणूक निरपेक्ष आयुष्याची सच्चाई जेव्हा समजते, तेव्हाच समाधान काही औरच असते. सागराची वारी मोजेवी असते, हेच इफ्फी निमित्ताने घडते.

१८९० च्या दशकात जन्मलेला सिनेमा जगामरातील संवेदनशील मनाच्या भल्याभल्यांना वेड लावतो. कलाकारांची खाण असलेल्या गोवा राज्यात या कला प्रेमाचा लाटा उफाळून कशा बरे येणार नाहीत? म्हणूनच काय या खुप्या गुणांमुळेच २००४ साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सरकारने इफ्फी गोव्यात आणला.

आज गेल्या २४ वर्षांत इफ्फीचे लोणचे खूपच छान मुरले आहे. वर्षभर पारंपरिक सण आणि विविध महोत्सव साजरा करणाऱ्या गोव्यात इफ्फी हा वर्षअखेरीचा एक आधुनिक सण म्हणून उदयास आला आहे. न्यू इयर सेलिब्रेशन गोवा हे समीकरण बदलून आता इफ्फी म्हणजे गोवा समीकरण रूढ झाले आहे. याला गोव्यातील राजकीय इच्छाशक्तीसोबतच सर्वसामान्यांची कलेवरची निष्ठा आणि प्रेम कारणीभूत आहे.

दुष्कर्मी नोव्हेंबरमध्ये इफ्फी केंद्र असलेले पणजी शहर नव्या नवलाईने नटलेले असते. बाहेरगावाहून व परदेशातून लोक इफ्फीसह पर्यटनासाठी गोव्यात येतात. रस्ता दुतर्फा दिसणारे पोस्टर्स व लाइटिंगमुळे उत्सुकता चाळवली जाते. मात्र, जुने सचिवालयासमोर असलेला तिरंगा पाहून एका सम्य वातावरणाची जाणीव होते.

या सर्वांच्या निमित्ताने होणारी गडबड व मुख्यतः वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन वाहतूक पोलिस दरवर्षी विशेष मेहनत घेतात. प्रचंड ताणव असतानाही शांत चित्ताने व हसतमुखाने एखादा ठिकाणचा पत्ता सांगणे, हे दृश्य फक्त गोव्यातच दिसते, मेट्रो सिटींमध्ये नाही. फाजिल पाऊस ठेलल्यापासून इफ्फीचे पोस्टर, झेंडे एका बाजूला आणि निळ्याशार समुद्रात तरंगणाऱ्या पर्यटक बोटींग, अभिमानाने तिरंगा, जेट्टीपासून लागणारी डेलिगेट्स यांची वर्दळ, सजलेले एसजीचे ऑफिस, मॅकनीज पॅलेस, विशुत शेषणाई केलेली जुने सचिवालय ते मिरामार पर्यंतचा रस्ता आणि मध्ये येणारी कला अकादमीची नटलेली नवीन वास्तू हेच काढून पारणे फेडते. पणजीची अवस्था तर 'एक इफ्फी का नगमा है' अशीच झाली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर परिसरात राहणाऱ्या ७५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या एका आजीबाईंची प्रतिक्रिया फार बोलकी ठरली. त्यांनी २००९-१० मध्ये लक्ष्मीकांत शेटगावकर यांचा पनथरोडी मणीस हा चित्रपट पाहिला होता. त्या म्हणतात, तो अस्सल गॉडन सिनेमा होता. तेव्हा दाखवलेली मानसिकता हीच असली गोमंतकीय मानसिकता होय, बाकी व्यवहार डिजिटलायझेशन सर्व झूठ आहे.

२००४ पासून ते या वर्षीपर्यंत इफ्फीमुळे त्यांची गॅरोसस होत आहे. ट्रॅफिक जाम, सततचा आवाज, जाणारा-येणाऱ्याची आवडणही त्या सांगतात, आता आम्ही कुठ झाले मानू या कर्कश वाटात, असेही त्या म्हणतात. गोव्याचा माणूस कलेवर किती प्रेम करतो, पर्यायाने जगाच्यावर किती प्रेम करतो याचा आणखी कसा पुरावा हवा? या प्रवासातील सुंदर आयुष्य हेच खरे समाधान. पुढचा आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर वेंहाड पणजीत छान मांडून बनणार आहे, हे आयुष्य म्हणे 'तैरी मेरी कहाणी' हे एकमेकांना सांगून वस्तुतः कुटुंबच या समजून घेणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT