Turkish Film The Farm IFFI Premiere  
गोवा

Turkish Film The Farm IFFI Premiere |मुक्यांच्या वेदनांना बालमनाचा संवेदनशील प्रतिसाद

57th IFFI Goa- इफ्फीत 'द फार्म' तुर्की चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय प्रीमियर; धाडसी मुलांचे कथानक

पुढारी वृत्तसेवा

पणजी : दीपक जाधव

माणसाच्या गरजा, व्यावसायिक स्वार्थ आणि मुक्या प्राण्यांचे नैसर्गिक हक्क यांच्यातील संघर्ष प्रभावीपणे मांडणारा 'द फार्म' हा चित्रपट केवळ एका मुलीच्या धाडसाची गोष्ट नाही, तर मानवी संवेदनशीलतेची कसोटी 1 पाहणारा अनुभव आहे. दिग्दर्शिका एलिफ एडा यांनी एका दुग्धव्यवसायाच्या शेताच्या पार्श्वभूमीवर हा विषय हाताळला आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'द फार्म' या तुर्कीस चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय प्रिमियर पार पडला. आई-वडिलांच्या निधनानंतर . आजीकडे राहायला आलेल्या बारा व वर्षांच्या प्रेमला शेतावरील दैनंदिन व्यवहारांतून एक अस्वस्थ करणारे वास्तव दिसते. अधिक दूध मिळवण्यासाठी नवजात वासरांना त्यांच्या आईपासून वेगळे केले जाते. व्यवसायाच्या दृष्टीने ही नियमित प्रक्रिया असली, तरी प्रेमच्या बालमनाला ती क्रूर वाटते.

या अन्यायाविरोधात ती हलीदच्या मदतीने गर्भवती गायींना मुक्त करण्याचा निर्णय घेते. चित्रपटाचा सर्वांत महत्त्वाचा पैलू म्हणजे विषयाकडे पाहण्याचा बालसुलभ, पण परिपक्च दृष्टिकोन. मोठ्यांच्या जगात स्वीकारल्या गेलेल्या अनेक गोष्टी चुकीच्या असू शकतात, याची जाणीव इरेमच्या व्यक्तिरेखेतून होते. अनाथ असलेल्या इरेम आणि हलीद यांच्यात निर्माण होणारे नातेही महत्त्वाचे आहे. स्वतः दुःख अनुभवलेल्या या दोन मुलांना दुसऱ्या जीवांच्या वेदना समजतात. त्यांच्यातील सहकार्य कथेला भावनिक आधार देते.

दिग्दर्शिका एलिफ एडा यांनी दूध उत्पादनाच्या प्रक्रियेमागील वास्तव आणि त्यातून निर्माण होणारे नैतिक प्रश्न कथानकाच्या केंद्रस्थानी आणले आहेत. दूध हे निरागसता आणि पोषणाचे प्रतीक मानले जाते; मात्र त्याच्या उत्पादनामागील प्रक्रियेतही शोषण दडलेले असू शकते, हा विरोधाभास चित्रपट अधोरेखित करतो.

इरेमचे आजीशी दुरावलेले नाते आणि नव्या वातावरणातील तिचा एकाकीपणा कथेला आणखी एक भावनिक स्तर देतो. पालकांच्या निधनानंतर आधार शोधणाऱ्या या मुलीला शेतावरील जनावरांच्या मातृत्वापासून होणाऱ्या ताटातुटीत स्वतःच्या दुःखाचे प्रतिबिंब दिसते, अशी या कथानकाची भावनिक मांडणी आहे.

नैतिक जबाबदारीचा विचार करायला लावणारा चित्रपट

ग्रामीण जीवन, निसर्ग आणि बालमनातील आशावाद यांची सांगड घालत चित्रपट संवेदनशील विषयाला मानवी चेहरा देतो. केवळ सहानुभूती व्यक्त करण्यापेक्षा अन्यायाविरोधात कृती करण्याची प्रेरणा देणे, हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरते. मुक्या जीवांच्या जगण्याचा आणि माणसाच्या नैतिक जबाबदारीचा विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT