जोआओ लामेईरा 
गोवा

Come With Me Portuguese Film IFFI |मैत्रीचा विषय सीमेपलीकडील प्रेक्षकांशीही जोडला जातो, पोर्तुगीज चित्रपट 'कम विथ मी'ला प्रेक्षकांची दाद

चित्रपटगृहातील अनुभवाच्या महत्त्वावर भाष्य

पुढारी वृत्तसेवा

57TH INTERNATIONAL FILM FESTIVAL OF INDIA

पणजी : प्रभाकर धुरी

मैत्री आणि एकत्रितपणे सिनेमा पाहण्याच्या सामायिक अनुभवाचा वेध घेणारा पोर्तुगीज चित्रपट 'कम विथ मी' (आंदा दाई) इफ्फीत चर्चेत आहे. सिनेमा ऑफ द वर्ल्ड विभागात या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला.

दिग्दर्शक जोआओ लामेइरा, जोआओ लामेइरा, अभिनेते अँटोनियो सिमाओ आणि निर्माते डॅनियल पेरेरा यांनी चित्रपटाच्या मैत्रीच्या विषयावर, आर्ट-हाऊस शैलीवर आणि स्ट्रीमिंगच्या काळात चित्रपटगृहातील अनुभवाच्या महत्त्वावर भाष्य केले. अभिनेते अँटोनियो सिमाओ यांनी पोर्तुगालमध्ये कमी होत चाललेली चित्रपटगृहातील प्रेक्षकसंख्या आणि घरी सिनेमा पाहण्याकडे वाढता कल याबद्दल चिंता व्यक्त केली. सिनेमा पाहणे म्हणजे फक्त चित्रपट पाहणे नव्हे, तर लोकांना भेटणे आणि सामूहिक सांस्कृतिक अनुभव घेणे आहे, असे ते म्हणाले. लोकांनी एकत्र येणे, बोलणे आणि एकमेकांना पाहणे गरजेचे आहे. सिनेमा चिरायू होवो, असे ते म्हणाले.

निर्माते डॅनियल पेरेरा यांनी त्यांची निर्मिती आणि वितरण कंपनी चित्रपटगृहातील प्रदर्शनाला प्राधान्य देत असल्याचे सांगितले. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा प्रभाव मान्य करताना, ते चित्रपटगृहाच्या अनुभवाला पर्याय नसून पूरक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

दिग्दर्शक जोआओ लामेइरा म्हणाले, जरी कथा लिस्बन आणि तेथील सांस्कृतिक वातावरणात रुजलेली असली, तरी पुरुष मैत्रीचा मध्यवर्ती विषय भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून प्रेक्षकांशी जोडला जावा, हा हेतू आहे.

आपण आर्ट-हाऊस किंवा मुख्य प्रवाहातील सिनेमा अशा कोणत्याही विशिष्ट वर्गीकरणाचा विचार करून चित्रपट बनविला नसल्याचे लामेइरा यांनी स्पष्ट केले. आपल्याला बनवायचा असलेला चित्रपट बनविणे आणि प्रेक्षकांना तो आवडेल अशी आशा बाळगणे, हाच हेतू होता. आर्ट-हाऊस आणि मुख्य प्रवाहातील सिनेमातील फरक काळानुसार बदलला असून, वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शकीय दृष्टीकोन आणि प्रभावी कथा असलेले चित्रपट पुन्हा एकदा व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याचे पेरेरा यांनी निरीक्षण नोंदवले.

गोव्याशी पोर्तुगालचे ऐतिहासिक नाते

इफ्फीत चित्रपटाचा वल्र्ड प्रीमियर सादर केल्याबद्दल चित्रपट निर्मात्यांनी आनंद व्यक्त केला. पोर्तुगाल आणि गोवा यांच्यातील ऐतिहासिक आणि स्थापत्यविषयक संबंधांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले, या प्रदेशातील काही बाबी परिचित वाटल्या, तरी एकूण अनुभव सांस्कृतिकदृष्ट्या वेगळा राहिला. गोव्याचा शोध घेण्याची आणि आपले काम भारतीय प्रेक्षकांसमोर मांडण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

चित्रपटाचे निर्माता विपुल अमृतलाल शाह असून पटकथा अमरनाथ झा व विपुल अमृतलाल शहा यांची आहे, डीओपी अभिजीत चौधरी तर संपादन संजय शर्मा यांचे आहे. उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा, आदिती भाटिया, सुमित गहलावत, अर्जन सिंग औजला, युक्त्तम खोसलाया कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

सिमाओ म्हणाले, वैयक्तिक अनुभव, निरीक्षण आणि कल्पना यातून अभिनय घडतो. नाट्यक्षेत्रातील प्रदीर्घ पार्श्वभूमीचा उल्लेख करताना ते म्हणाले, सुरुवातीला पात्र आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या जवळचे वाटले, त्यामुळे त्या भूमिकेत आपण कोणते वैयक्तिक अनुभव आणू, याची जाणीव झाली. अखेरीस त्या चिंतांच्या पलीकडे जाऊन पात्राची परिस्थिती आणि कृती यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT