IFFI Goa 2026 
गोवा

IFFI Goa 2026 | गोव्यात शुक्रवारपासून अवतरणार चंदेरी दुनिया; 57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

IFFI Goa 2026 | भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; उत्सुकता वाढली

पुढारी वृत्तसेवा

पणजी (पुढारी वृत्तसेवा):

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होत आहे. त्यानिमित्त गोव्यात चंदेरी दुनिया अवतरणार आहे. साहजिकच महोत्सवाची तयारी सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आली आहे. यंदाची संकल्पना 'स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स' असून, त्यानुसार सजावटीला वेग आला आहे.

मांडवी नदीकिनारी, दयाानंद बांदोडकर मार्गावर आकर्षक रोषणाई करण्याचे काम जोरात सुरू आहे. तसेच ईएसजी संकुल, जुना जीएमसी परिसर, कला अकादमी, आयनॉक्स परिसरात सजावट सुरू आहे. ईएसजीच्या प्रांगणात ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे लोगो बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

प्रशासनाचे लक्ष

महोत्सवाचे उद्घाटन आणि समारोप सोहळा ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर होणार आहे. यासाठी स्टेडियममध्ये मुख्य व्यासपीठ, ध्वनी आणि प्रकाशयोजना तसेच सुरक्षा व्यवस्थेची तयारी सुरू आहे. इफ्फीच्या निमित्ताने पणजीसह गोव्यातील चित्रपट महोत्सवाच्या वातावरणाला हळूहळू रंग चढू लागला असून उर्वरित तयारी वेळेत पूर्ण करण्याऱ्यावर प्रशासनाचा भर आहे.

जागतिक चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक आणि प्रतिनिधींच्या स्वागतासाठी राजधानी पणजीला सजविण्याचे काम सुरू असून ईएसजी परिसर, कला अकादमी आणि आयनॉक्स परिसरात सजावट, मास्टरक्लास तसेच विशेष संवाद कार्यक्रमांसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत आहे.

इफ्फीत यंदा स्पॅनिश सिनेमांची मेजवानी

५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) सहभागी होणाऱ्या चित्रपट रसिकांसाठी यंदा विशेष पर्वणी ठरणार आहे. यंदाच्या महोत्सवात स्पेनला 'कंट्री ऑफ ऑनर' म्हणून गौरविण्यात आले असून, या निमित्ताने समकालीन स्पॅनिश चित्रपटसृष्टीची समृद्धता आणि विविधता दर्शविणाऱ्या चार निवडक चित्रपटांचे विशेष सादरीकरण केले जाणार आहे. यामध्ये काही चित्रपटांचे जागतिक, आशियाई, तर काहींचे भारतीय प्रीमियर पार पडणार आहे.

  • बिटर क्रिसमस:

    दोन वेळा ऑस्कर पुरस्कार विजेते दिग्दर्शक पेड्रो अल्मोडोवर यांचा हा २०२६ मधील चित्रपट आहे. चित्रपट निर्मितीमध्ये वैद्यकीय अनुभव आणि खऱ्या घटनांचा वापर केला जाणारारा धोके आणि एखादी प्रामाणिक कथा सांगण्यासाठी दिग्दर्शक कोणाच्या आयुष्यात किती गोष्टी जगासमोर आणू शकतो, याचा वेध यातून घेण्यात आला आहे. नवीन चित्रपटाच्या कथेसाठी संघर्ष करणारा 'राऊल' नावाचा दिग्दर्शक स्वतःच्या आयुष्यातील एका मोठ्या दुर्घटनेतून प्रेरणा घेऊन नवीन पटकथा कशी लिहितो, याभोवती ही कथा फिरते. यामोवती ही कथा फिरते. कान्स, टोरंटो आणि सॅन सेबॅस्टियन यांसारख्या प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये गाजलेल्या या चित्रपटाचा 'इंडिया प्रीमियर' इफ्फीमध्ये होणार आहे.

  • लुकिंग फॉर मायेकल:

    जुआना मॅंसियास दिग्दर्शित हा २०२६ मधील विनोदी-नाट्यमय (कॅमेडी-ड्रामा) चित्रपट 'पार्कन्सन' आजाराचे निदान झालेल्या एका तरुणार्थी प्रेरणायची कथा मांडतो. नशिबाने दिलेल्या या दुःखापुढे हार न मानता ती वेगवेगळ्या पद्धतीने जगण्याचे ठरवते. पार्किन्सनशी झुंज देणाऱ्या आपल्या म्युझिक थेरपी ग्रुपच्या मदतीने ती प्रसिद्ध अभिनेते मायकेल जे. फॉक्स (जे स्वतः पार्किन्सनशी लढा देत आहेत) यांना भेटण्यासाठी प्रवासाला निघते. या चित्रपटाचा 'वर्ल्ड प्रिमियर' इफ्फी २०२६ मध्ये पार पडणार आहे.

  • द बॅंड सन:

    स्पॅनिश अभिनेता-दिग्दर्शक जेनी लॉरेटे यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट असून, इफ्फी २०२६ मध्ये याचा 'एशियन प्रिमियर' होणार आहे.

  • त्रिनिदाद:

    लॉरिअ आल्लिया आणि होजे आँटुनी यांनी दिग्दर्शित केलेला हा २०२५ मधील अंक्शनपट १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील एका तरुण स्पॅनिश महोत्सवाच्या साहसाची कथा सांगतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT