पणजी : पुढारी वृत्तसेवा
५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी) 'क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो' (सीएमओटी) स्पर्धेत मोहक गांधी दिग्दर्शित 'वन लास्ट स्टॉप' या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. रेड टीमच्या या चित्रपटाला पाच लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. तमन्ना ठाकूर दिग्दर्शित 'अ लिटल समथिंग' या ग्रीन टीमच्या चित्रपटाला उपविजेतेपद आणि तीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले.
सीएमओटीच्या सहाव्या पर्वाचा मंगळवारी समारोप झाला. देशभरातील १०० तरुण व्यावसायिकांनी ४८ तासांच्या आव्हानात चित्रपट निर्मिती कौशल्याची चुणूक दाखवली. पाच संघांनी तयार केलेल्या लघुपटांचे प्रदर्शन आणि १५ विविध श्रेणींतील पुरस्कार वितरणाने या उपक्रमाची सांगता झाली.
अन्य पुरस्कार विजेते :
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - तमन्ना ठाकूर ('अ लिटल समथिंग' - ग्रीन टीम); सर्वोत्कृष्ट अभिनेता - द्वी पारकर ('शेल्स' - ब्लू टीम); सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार - त्रिशा मन्ना ('वन लास्ट स्टॉप' - रेड टीम); सर्वोत्कृष्ट संकलक - नयन चोटालिया आणि मानव अग्रवाल ('अ लिटल समथिंग' - ग्रीन टीम); सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक - जितिन एस ('शेल्स' - ब्लू टीम); सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन - अश्विन अशोक ('टू सनसेट्स अँड झिरो सनरायझेस' - यलो टीम); सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - पार्वती एस ('शेल्स' - ब्लू टीम); सर्वोत्कृष्ट संगीतकार -
अक्षय अनमोल कातोरे ('नील मछली' - बेज टीम); सर्वोत्कृष्ट वेशभूषा - सृष्टी वाघ आणि रूपालिका पॉल ('वन लास्ट स्टॉप' - रेड टीम); सर्वोत्कृष्ट केशभूषा आणि रंगभूषा - कशिश जयस्वाल ('शेल्स' - ब्लू टीम); सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन - सृष्टी वाघ आणि रूपालिका पॉल ('वन लास्ट स्टॉप' - रेड टीम); सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स कलाकार - हर्ष सहानी आणि प्रकाश कुमार मेहता ('नील मछली' - बेज टीम); सर्वोत्कृष्ट व्हॉइस-ओव्हर / डबिंग - सुदेक्षा सरकार ('अ लिटल समथिंग' - ग्रीन टीम).
समारोप सोहळ्याला इफ्फीचे महोत्सव संचालक आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि एफटीआयआयचे कुलगुरू धीरज सिंग यांच्यासह परीक्षक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. यंदाच्या 'ग्रेट ग्रँड ज्युरी'मध्ये ऐमी बरुआ, प्रेमराज, मधू अप्सरा, रुमी जाफरी आणि मेधा खेडकर रेड्डी यांचा समावेश होता.